बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Updated : मंगळवार, 23 जुलै 2024 (16:44 IST)

कैलास शिव मंदिर एलोरा

हिंदू धर्मामध्ये देव आणि मंदिरांना खूप महत्व आहे, कारण असे मानले जाते की प्रत्यक्ष भगवंतच ही सृष्टी चालवत आहे. त्यांच्या इच्छेनुसार ही सृष्टी चालते. तसेच हिंदू धर्माची मान्यता आहे की सृष्टीच्या कणाकणामध्ये देवाचा वास असतो. तसेच भारताची संस्कृती एवढी अद्भुत आहे की ठिकठिकाणी आपल्याला वेगवगेळ्या देवांचे मंदिर पाहावयास मिळतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत. जे खूप लक्षणीय आणि अद्भुत आहे.असे सांगतात की हे मंदिर बनवण्यासाठी 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. ज्या मंदिराचे नाव आहे कैलास शिव मंदिर. 
 
हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या एलोराच्या गुफांमध्ये आहे. ज्याला एलोराचे कैलाश मंदिर नावाने देखील ओळखले जाते. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे की, केवळ एकाच दगडावर ही मंदिर उभे आहे. तसेच या मंदिराची उंची दोन ते तीन मजली इमारती एवढी आहे. तसेच या मंदिराच्या निर्माणमध्ये कमीतकमी 40 हजार टन वजन खडक कापण्यात आले होते. हे मंदिर  भगवान शिवांना समर्पित आहे. 
 
महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्ये उभे कैलाश मंदिर विश्वातील एकमात्र असे विशाल मंदिर आहे जे एकच खडक कापून बनवले गेले आहे. ही पूर्ण संरचना द्रविड शैलीचे एक अद्भुत उदाहरण आहे.  
 
मंदिर का इतिहास-
10 व्या शतकामध्ये लिहण्यात आलेले एक पुस्तक “कथा कल्पतरू ” मध्ये एक लोककथा देण्यात आली आहे. या लोककथा अनुसार 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकुट राजवंशचे राजा ऐलू यांच्या राणीने प्रण घेतला होता की, जोपर्यंत भगवान शंकरांचे भव्य मंदिर बनत नाही तो पर्यंत ती जेवणार नाही. राणीने स्वप्नामध्ये मंदिराचा कळस पहिला होता आणि तिला त्याचप्रकारे मंदिर हवे होते. राजाने अनेक शिल्पकारांना आमंत्रित केले पण त्यामधील कोणीच राणीची इच्छा पूर्ण करू शकले नाही. शेवटी पैठणमधून कोकासा नावाचा शिल्पकार आला व त्याने, मंदिर निर्माण करण्यासाठी खडकाला वरतून खाली कोरण्यास सांगितले.
 
भगवान शंकरांना समर्पित आहे मंदिर-
भगवान शंकरांना समर्पित असलेल्या या विशाल मंदिराचे निर्माण 8 व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण आई व्दारा करण्यात आले होते.  
 
कैलाश मंदिराची विशेषता-
अनेक प्राचीन मंदिरांप्रमाणे या मंदिराची देखील विशेषतः आहे. जी सर्व पर्यटकांना हैराण करते.
 
भगवान शंकरांचे हे मंदिर मजबूत खडक कापून बनवण्यात आले आहे.
 
एलोराचे कैलाश मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एलोरा गुफांमध्ये स्थापित आहे.
 
हे मंदिर बनवण्यासाठी कमीतकमी 150 वर्ष लागले व  कमीतकमी 7000 मजुरांनी यावर काम केले आहे. 
 
कैलाश मंदिर बघण्यासाठी वेळ–
आठवड्यातील मंगळवार सोडून बाकी इतर दिवशी सकाळी 7:00 – संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत हे मंदिर पर्यटकांसाठी खुले असते.
 
कैलास मंदिर प्रवेश शुल्क-
कैस्ल्श मंदिर पाहण्यासाठी भारतीयांना प्रवेश शुल्क 10 रूपये द्यावे लागतात तर विदेशी पर्यटकांना 250 रूपये एवढे शुल्क काढावे लागते.
 
कैलाश मंदिर महाराष्ट्र कसे जावे- 
कैलास मंदिर एलोराच्या 16 व्या गुफा मध्ये स्थित आहे आणि इथे फिरायला जाण्यासाठी तुम्ही फ्लाइट, ट्रेन आणि बस कशाचीही निवड करू शकतात.
 
फ्लाइट-
जर तुम्हाला या मंदिराला भेट देण्यासाठी फ्लाईटने जायचे असेल तर तुम्हाला या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी औरंगाबाद विमानतळ जवळ आहे. औरंगाबाद विमानतळापासून हे मंदिर 35 किलोमीटर दूर आहे. विमानतळावरून तुम्ही बस किंवा टॅक्सीच्या मदतीने हे मंदिर पाहण्यासाठी जाऊ शकतात.
 
ट्रेन-
जर तुम्हाला रेल्वेने हे मंदिर पाहण्यासाठी जायचे असेल तर औरंगाबाद रेल्वे स्टेशन मुंबई आणि पुण्याशी जोडलेले आहे. तसेच जळगाव रेल्वे स्टेशन देखील इथून जवळचे स्टेशन आहे. इथून तुम्ही टॅक्सी किंवा बस ने जाऊ शकतात.
 
बस- 
जर तुम्हाला कैलास मंदिर पाहण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने जायचे असेल तर औरंगाबादमधील अजिंठा जवळून100 किमी आणि एलोरा पासून 30 किमी दूर आहे. अजिंठा एलोराच्या गुफांपर्यंत पोहचण्यासाठी  तुम्ही स्थानीय टॅक्सी भाड्याने ठरवू शकतात. किंवा राज्य परिवह ने देखील प्रवास करू शकतात.