शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By

Mangalgraha Mandir Amalner मंगळ ग्रह दोष निवारणासाठी जागृत देवस्थान

Mangalgraha Mandir Amalner मंगळ देव यांना भूमीपुत्र म्हटले आहे. कुंडलीत मंगळ दोष असल्यास मंगळ ग्रहाची शांती केली जाते. मंगळ शांतीसाठी एक विशेष स्थान उज्जैनमधील मंगलनाथ मंदिर असून दुसरे जळगावजवळील अमळनेर येथे असल्याचे सांगितले जाते. अमळनेर येथील मंदिर प्राचीन, दुर्मिळ आणि जागृत देवस्थान मानले गेले आहे.
 
मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे. जाणकारांच्या मते मंदिराचा प्रथम जीर्णोद्वार सन 1933 मध्ये झाला. नंतर 1999 नंतर झालेल्या जीर्णोद्वारानंतर भक्त मंदिराकडे आकर्षित होत आहे.
 
येथे मंगळवारी भाविक मोठ्या संख्येने येतात कारण ही देवता सर्व मनोकामना पूर्ण करणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. येथे मंगळ दोष शांती होत असल्याने मांगलिक असल्यामुळे किंवा विविध कारणांमुळे विवाहयोग जुळून येत नसलेल्या भाविकांसह शेतकरी, व्यावसायिक, तसेच सुरक्षा आणि सैन्य दलाशी संबंधित भाविक देखील दर्शनासाठी येतात.
 
विशेष म्हणजे येथे कोणत्याही प्रकाराचा टॅक्स नाही, पार्किंगसाठी शुल्क नाही, दर्शनासाठी व्हीआयपी सुविधा नाही, मंदिराच्या बाहेर पूजा साहित्यासाठी मनमानी दराने विक्री होत नाही, राहण्याची आणि खाण्याची किमान दरावर उत्तम सोय तर शुद्ध पाण्याची व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छता, हिरवळ यामुळे येथील वातावरण भाविकांचे मन प्रसन्न करते.
 
मंगळग्रह मंदिर अमळनेर कसे पोहचाल? How to Reach Shri Mangal Graha Mandir Amalner Maharashtra:
 
जळगाव पासून अमळनेर सुमारे 60 किमी अंतरावर आहे. तर धुळेपासून अमळनेर सुमारे 36 किमी अंतरावर आहे. येथील बस स्थानकावरुन बस व खाजगी वाहनांचे पर्याय आहेत.
 
मंगळ ग्रह मंदिर अमळनेर पत्ता- मंगळ ग्रह मंदिर, चोपडा रोड, धनगर गल्ली, अमळनेर, महाराष्ट्र 425401
Mangal Grah Mandir, Chopra Rd, Dhangar Galli, Amalner, Maharashtra 425401