मोदी बनले ''सत्तेचे सौदागर''
|
उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचे सोशल इंजिनियरींग जोरदार चालले. त्यामुळे पंधरा वर्षांनंतर कुणा एका पक्षाला तेथे बहूमताने सत्ता मिळाली. गुजरातमध्ये मीडीयाच्या तसेच विरोधकांच्याही प्रचाराला धूप न घालता मतदारांनी नरेंद्र मोदींना भरभरून मते दिली आणि त्यांना सत्तेचे सौदागर बनविले.
भगवा फडकला-
भगव्याची कास धरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला गेले वर्ष आनंदाचे गेले. उत्तराखंडात कॉंग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली. गेल्या निवडणुकीत ३६ जागा मिळविणाऱ्या कॉंग्रेसला यावेळी पख्त २१ जागाच मिळू शकल्या. जनरल (निवृत्त) भुवनचंद्र खंडूरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आले. भाजपला आनंद साजरा करण्याची संधी दिली ती पंजाबने. शिरोमणी अकाली दलाच्या साथीने भाजपने पंजाबमध्ये कॉंग्रेसला सत्तेवरून खाली खेचले. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद खेचून घेत शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री झाले.
| |
वाजपेयींचा राजसंन्यास
माजी पंतप्रधान अटलबिहारी या वर्षात राजकारणातून निवृत्तच झाल्यासारखे होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा तोंडावळा वाजपेयीच होते. पण ते निवृत्त झाल्याने पक्षाला फटका बसला. आता पक्षाने लालकृष्ण अडवानींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले आहे. पण कट्टर हिंदूत्ववादी अडवानींनी सगळे पक्ष स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे.
कॉंग्रेसला २००७ चा फटका
कॉंग्रेससाठी हे वर्ष कटू आठवणींनी भरलेले असेच गेले. उत्तराखंड, पंजाब या राज्यांची सत्ता पक्षाने गमावली. उत्तर प्रदेशची सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न मायावतींनी असे काही उधळून लावले की या निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळणारे राहूल गांधी पार भिरभिरून गेले. म्हणूनच गुजरातच्या निवडणुकीतही ते एकदाच प्रचारात सहभागी झाले. उत्तर प्रदेशात खुद्द सोनिया गांधी व राहूल यांनी घेतलेल्या सभा, रोड शो यांचा काही म्हणजे काही उपयोग झाला नाही.
तीच कथा गुजरातची. गुजरातमध्ये सोनियांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवून बेअरींग तर छान घेतले. त्यांच्या सभांना गर्दीपण चांगली झाली. राहूलचा रोड शोही गाजला. पण मतदारांनी कॉंग्रेसला वाकुल्या दाखवल्या. विशेष म्हणजे सोनियांच्या सभा जेथे जेथे झाल्या तेथे तेथे त्यांना पूर्वीपेक्षा कमी जागा मिळाल्या. गुजरातमध्ये तर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगही प्रचारासाठी आले होते. पण तरीही काहीही उपयोग झाला नाही.
कॉंग्रेससाठी समाधानाची बाब म्हणजे गोव्यात कसे बसे सरकार बनविता आले. पण त्याचवेळी हरियानात पक्षात फूट पडल्याने भविष्यत पक्षाला त्रास होईल, याचे संकेतही दिसले. पक्षाचे ज्येष्ठ नेते भजनलाल यांनी पक्षातून बाहेर पडून नविन पक्ष स्थापन केला. सध्या राज्यातील सरकारला धोका नसला तरी भविष्यात काही सांगता येत नाही.
राहूलच्या भाळी पदाचा टिळा
| ND | ND |
उत्तर प्रदेशात मायाजाल
| ND | ND |

