शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

आगामी वर्षात सत्तापरिवर्तनाचे योग

- पं. अशोक पवार

ND
सन 2008 ला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरू आहे. परंतु, सन 2008 च्या अखेरीस मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला ही देशातील सर्वांत मोठी दुर्देवी घटना ठरली. आपल्या जवानांनी प्राणांची बाजी लावून मुंबईला दहशतवाद्यांपासून मुक्त केले. या पार्श्वभूमीवर आता नवीन वर्षात देशवासीयांना अनेक अपेक्षा आहेत. सर्व पक्षांनी राजकारण सोडून देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्यास नवीन वर्ष देशबांधवांसाठी सुखकारक राहील. सत्तापरिवर्तानाचे योगही आगामी वर्षात शक्य आहेत. ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून नवीन वर्ष कसे असेल हे पाहू या.

नववर्षी दिल्लीत मध्यरात्री कन्या लग्नाचा उदय होत आहे. या वर्षी धर्म, न्याय आणि कर्तव्यनिष्ठेचा स्वामी गुरू कनिष्ठ होऊन राहू, चंद्र, बुधाबरोबर राहणार आहे. गुरू-राहू बरोबर असतील तर चांडाळ योग येऊ शकतो. त्यामुळे शत्रूपासून असलेला धोका कमी होण्याची शक्यता नाही. शनीची शुक्रावर पूर्ण सप्तम नजर पडत असल्याने महिला वर्गास हे वर्ष कष्टदायक राहील. मंगळ, सूर्य, चतुर्थ भावात असल्याने जनतेची कामे वेगाने होतील. मंगळाची एकादश भावात चांगली नजर नसल्यामुळे आर्थिक बाबतीत उतार-चढाव कायम राहणार आहेत. शत्रूशी लढण्यातच मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होईल. शनीची द्दष्टी द्वितीय भावात असल्याने भारताची शत्रूबाबतची भाषा कठोर असेल. लग्नेश व दशमेश पंचममध्ये मित्र असल्याने व्यापारी वर्गासाठी वर्ष चांगले राहिल.

ND
महत्वाच्या व्यक्ती: देशाच्या पंतप्रधानांची कर्क राशी आहे. ते आर्थिक परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असतील. देशाच्या सुरक्षेवरही ते भर देतील. तसेच विरोधकांनाही पुरून उरतील. सोनिया गांधींच्या राशीत मिथून असल्याने त्यांच्यासाठी वेळ अनुकूल असणार आहे. शनीची कृपा चौथ्या भावात उच्च असल्याने जनसामान्यातील त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. राहुल गांधीच्या कुंडलीत वृश्चिक, मंगळामुळे आगामी काळात त्यांना यश मिळेल. त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. परंतु, सुरक्षेच्या द्दष्टीने त्यांना सावध रहावे लागणार आहे. बसप प्रमुख मायावातींचे महत्व दिवसंदिवस वाढत जाईल. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे दावेदार लालकृष्ण आडवाणी यांना मोठ्या संघर्षानंतरच यश मिळू शकते.

IFM
बॉलिवूड: बॉलिवूडमधील मुख्य कलाकार अमिताभ बच्चन यांना आरोग्यासंदर्भात खूपच सावधगिरी बाळगावी लगेल. शाहरूख खानसाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. सलमानच्या राशीत धनू असून गुरूही कनिष्ठ असल्याने त्याला सावधगिरी बाळगावी लागेल. अक्षयकुमारची रास तूळ असून त्यावर शनीच्या उच्च दृष्टी पडत असल्याने त्याचे चित्रपट यशस्वी होतील.

ऐश्वर्या बच्चनसाठी हे वर्ष फारसे चांगले राहणार नाही. तिच्या राशीत धनू असून त्याचा स्वामी गुरु कनिष्ठ आहे. तरीही तिची चित्रपट कारकीर्द बर्‍यापैकी राहिल. प्रियंकासाठी हे वर्ष चांगले राहिल. करीना कपूरची रास मकर असून गुरुची सप्तमवर उच्च दृष्टी आहे. यामुळे या वर्षी तिचे लग्न होण्याची शक्यता आहे. तसेच चित्रपट कारकिर्दीतही चांगले यश मिळेल.

ND
क्रिकेट खेळाडू : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी पहिले सहा महिने लाभदायी राहणार असून दुसर्‍या सहामाहीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. युवराजसाठी हे वर्ष अनुकूल राहणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिनच्या राशीत धनू असून तिचा स्वामी गुरू कनिष्ठ आहे. यामुळे सचिनला खूपच सांभाळून रहावे लागणार आहे. सौरव गांगुलीची रास वृषभ असल्याने तो राजकारणात जाण्याची शक्यता आहे. राजकारणात त्याला यशही मिळेल.

ND
उद्योगपती: प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानीसाठी हे वर्ष खडतर राहणार आहे. त्यांच्या राशीत धनू असून त्याचा स्वामी गुरूही कनिष्ठ आहे. रतन टाटा यांच्यासाठी हे वर्ष यश मिळविणारे राहणार आहे. त्यांच्या राशीत शनीची उच्च द्दष्टी असल्याने यश त्यांना यश सहज मिळेल.