गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

इंग्रजी साहित्यासाठी २००८ उत्साहवर्धक

ND
साहित्य क्षेत्रासाठी सन 2008 उत्साहवर्धक होते. बुकर पुरस्कार प्राप्त अरविंद अडीगा यांच्या 'द व्हाइट टायगर' पुस्तक पुरस्कारामुळे जास्त खपले गेले. काश्मिरी कवी रहमान राही हे ज्ञानपीठ पुरस्कारानंतर चर्चेत आले. तर अमेरिकी पत्रकार शेरी जोन्स यांचे पुस्तक प्रकाशनापूर्वीच वादात अडकले. चेतन भगत यांचे 'वन नाइट एट दी कॉल सेंटर' हे पुस्तकही त्यावरील चित्रपटामुळे चर्चेत राहिले.

वर्षाच्या सुरवातीला अमेरिकी पत्रकार शैरी जोन्स यांच्या 'द ज्वेल ऑफ मदीना' या पुस्तकाची चर्चा झाली. पुस्तक प्रसिध्द होण्यापूर्वी प्रकाशक रेंडम हाऊसने अंग काढून घेतले. प्रकाशकाने लेखिकेस जवळपास 50 हजार पौंड आगाऊ रक्कमही दिली होती. तसेच महत्वाच्या आठ शहरात प्रसिध्दीबाबत योजनाही तयार केली होती. परंतु, असे काय झाले की प्रकाशकाने काढता पाय घेतला.

  'हे पुस्तक वादग्रस्त आहे. ते प्रकाशित केल्यास हिंसक प्रतिक्रिया उमटू शकतात.' प्रकाशकाच्या या स्पष्टीकरणानंतर वाचकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या.      
'द ज्वेल ऑफ मदिना' जोन्स यांचे पुस्तक मुख्यत: मोहम्मद साहेबांची अल्पवयीन वधू आयेशावर आधारित आहे. त्यात आयशाच्या साखरपुड्यापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. जोन्सने अनेक वर्ष अरब इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर पुस्तक लि‍हिले. त्याला प्रसिध्द करण्याची जबाबदारी रेंडम हाऊसने उचली होती. रेंडम हाऊसने पुस्तक प्रसिध्द करण्यापूर्वी इस्ला‍‍मिक इतिहासाचे अभ्यासक प्रोफेसर डेनिज यांच्याकडे समीक्षेसाठी पाठविले. त्यांनी पुस्तक 'सॉफ्ट-कोर पोर्नोग्राफी' असल्याचा आरोप केला. यामुळे रेंडम हाऊसने पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार सोडून दिला. याबाबत रेंडम हाऊसच्या प्रवक्याने सांगितले की, 'हे पुस्तक वादग्रस्त आहे. ते प्रकाशित केल्यास हिंसक प्रतिक्रिया उमटू शकतात.' प्रकाशकाच्या या स्पष्टीकरणानंतर वाचकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रकाशकच संकोच करत असून ते कट्टरपंथीयांच्या दबावाखाली आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

प्रा. स्पैलबर्गने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, हे पुस्तक स्फोटक आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण होणार आहे. स्पैलबर्ग यांच्या अभिप्रायानंतर रेंडम हाऊसने हे पुस्तक प्रसिध्द करण्याचे धाडस केले नाही. त्यांना हे पुस्तक सलमान रशीद यांच्या पुस्तकापेक्षाही जास्त वादग्रस्त वाटले.

ND
पुस्तकाबाबत जोन्स यांनी म्हटले आहे की, 'मी दोन संस्कृतीमध्ये पुल निर्माण व्हावा म्हणून हे पुस्तक प्रसिध्द करु इच्छित होती. मी आयेशाबरोबर मोहम्मद साहेबांच्या सर्व पत्नींच्या बाबतीत लिहिले होते. त्यांना आदरपूर्वक शब्दांमध्ये शब्दबध्द केले होते.' या सर्व प्रकारानंतर जोन्स आता नवीन प्रकाशकांचा शोध घेत आहे.

भारतीयांच्या दृष्टिकोनातून काश्मिर‍ी कवी रहमान राही यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार सुखद संदेश होता. नंतर राही यांचा प्रसिध्द झालेल्या कविता संग्रहास चांगली मागणी आली.

दुसरीकडे सन 2008 मध्ये बुकर पुरस्कार मिळताच अरविंद अडिगा यांचे 'द व्हाइट टाइगर' हे पुस्तक चर्चेत आले. हे पुस्तक भारतातील सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करते. गरीबीपासून मुक्ती मिळ‍‍‍विण्यासाठी इच्छुक असणार्‍यांचे प्रतिबिंब पुस्तकातून उमटते. 22 एप्रिल 2008 मध्ये प्रसिध्द झालेले हे 288 पानांचे पुस्तक भारतातील गरीबीचे मार्मिक सत्य आहे.

ND
चेतन भगत यांचे 'वन नाइट एट दी कॉल सेंटर' या पुस्तकाने चांगलीच चर्चा निर्माण केली. या कांदबरीवर अतुल अग्निहोत्री याने 'हॅलो' चित्रपट तयार केला. चित्रपट आपटला परंतु कांदबरी चांगलीच लोकप्रिय ठरली. चेतनचे थ्री मिस्टेक्स इन माय लाईफ हे पुस्तकी या वर्षी बाजारात आले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.