मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मागोवा 2008
Written By वेबदुनिया|

ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून 2009 वर्ष

-भारती पंडीत

नूतन वर्ष 2009 च्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. वर्ष 2008 ला निरोप व वर्ष 2009 चे स्वागत करण्यासाठी कमालीता उत्साह आहे. हे आगामी वर्ष कसे जाईल याविषयीही तितकीच उत्सुकता दिसून येत आहे. विविध राशीच्या व्यक्तींना हे वर्ष काय फळ देणार आहे हे पहा ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून....

राशीनुसार भविष्य-

ND
मेष: वर्चस्व व प्रभावात वृध्दी होईल. कार्यक्षेत्रात प्रतिस्पर्धी व हितशत्रु सक्रिय असतील. बचत केलेले धन घटेल. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये आरोग्यविषयक समस्या उद्भवतील. व्यापार व्यवसायात दबदबा राहील. मार्च- एप्रिल महिन्यात प्रॉपर्टीची कामे करू नये. मेमध्ये परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक योग उत्तम, आवक वाढेल. सप्टेबर- डिसेंबरमध्ये आळस झटकावा लागेल. शनीची आराधना सुरू ठेवावी लागेल.

ND
वृषभ: संपूर्ण वर्षभर संघर्ष करावा लागणार आहे. आरोग्यविषयक अडचणी राहतील. कार्यक्षेत्रात परिश्रमानुसार फळाची अपेक्षा करावी. जानेवारी ते मार्च परिस्थिती साधारण राहिल. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सावधगिरी बाळगावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. वर्षाचा उत्तरार्ध अनुकूल राहील.

ND
मिथून: कार्यक्षेत्र अनुकूल, अधिकार गाजवाल. आरोग्यविषयक तक्रारी राहतील. जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जानेवारी, एप्रिल, जून, जुलै व सप्टेंबर महिन्यात सावधगिरी बाळगा. नवीन कार्याचा विचार देखील करू नका. शनी व शंकराची उपासना केल्याने लाभ होईल.

ND
कर्क: अनुकूल काळ आहे. बचत करू शकाल. व्यापार-व्यवसायात सुधारणा होईल. भाग्य अनुकूल आहे. जोडीदारासोबत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. फेब्रुवारी ते जुलैदरम्यान स्थिती अनुकूल राहील. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान विशेष काळजी घ्यावी लागेल. वर्षाचा शेवट साधारण राहिल. भावनांवर नियंत्रण राखा. शिवशंकराची भक्ती करा.

ND
सिंह: मानसिक तणाव निर्माण होईल, अधिक परिश्रम घ्यावे लागतील. परिश्रमानुसार फळ मिळणार हे निश्चित. संततीसाठी अनुकूल काळ आहे. जानेवारील फेब्रुवारी, मे व ऑक्टोबर महिन्यात सावध रहावे लागेल. वर्षाचा शेवट अनुकूल राहील. शनी व राहू यांचा जप सुरू ठेवावा.

ND
कन्या: संमिश्र फळ मिळणार आहे. तणाव वाढेल. अधिक खर्च करावा लागेल. अधिक परिश्रम केल्याने त्यावर मार्ग निघणार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. फेब्रुवारी, मे, जून, सप्टेबर व ऑक्टोबर महिन्यात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षमतेत वाढ करावी लागेल. कालभैरवाची उपासना फळ देणारी ठरेल.

ND
तूळ: मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात हानी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. व्यापार-व्यवसायात अडचणी निर्माण होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. अचानक लाभ होईल. एप्रिल, मे, जुलै, ऑक्टोबरमध्ये तणाव निर्माण होईल. आर्थिक नुकसान होण्‍याची शक्यता. दुर्गा मातेची आराधना करावी.

ND
वृश्चिक: मिश्र फळ देणारे वर्ष ठरणार. मित्र व भाऊबंदापासून अडचणी निर्माण होतील. वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होतील. परिश्रम अधिक घेतल्यास त्याचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. जानेवारी, मार्च, एप्रिल, जुलै, ऑगस्टमध्ये सावध रहावे लागेल. राहू, शनीचा जप करावा.

ND
धनू: व्यवसायात यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात वाद होतील. पोटाचे विकार उद्‍भवतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे दरम्यानचा काळ प्रतिकूल राहील. विष्णूची आराधना करावी.

ND
मकर: आरोग्यविषयक समस्या उद्‍भवतील. मानसिक तणाव निर्माण होईल. अधिक परिश्रम घेण्याची गरज. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मार्च, मे, ऑगस्ट, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात चांगले फळ मिळतील. श्रीराम भक्त मारोतीची आराधना करावी.

ND
कुंभ: चांगले फळ देणारे वर्ष. प्रवासाचे योग आहेत. आरोग्यविषयक समस्या राहतील. वाहन चालवताना काळजी घ्या. फेब्रुवारी, एप्रिल, जून व डिसेंबर महिना प्रतिकूल, वर्षाच्या शेवटी फळ मिळेल. राहूचा जप करून सरस्वतीची आराधना करावी.

ND
मीन: धन, यश, व व्यापारासाठी उत्तम. परंतु, आरोग्य, कुटूंबियासाठी कठीण स्थिती. हितशत्रू वाढणार आहेत. आत्मविश्वास वाढवावा लागेल. जानेवारी, मार्च, जुलै ते नोव्हेबरपर्यंत अनुकूल स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. शनीचा जप करावा लागेल.