बिग बँग महाप्रयोगचे वर्ष
| 'बिग बँग' प्रयोगासाठी तयार केलेले 'हैड्रॉन कोलाइडर' हे महामशीन युरोपियन ऑर्गेनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्चने तयार केले होते. याचा उद्देश 'हाय एनर्जी फिजिक्स' चा शोध घेण्याचा होता. वैज्ञानिकांनी या प्रयोगास जगातील सर्वांत मोठा प्रयोग म्हणून नाव दिले होते. महाप्रयोगाच्या यशामुळे आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतीकारक बदल होण्याच्या अपेक्षा होत्या. या प्रयोगातून निघणार्या प्रोटॉन, कार्बन आयन आणि एंटी-मॅटरच्या पार्टिकल बीममुळे कर्करोगावर उपचार शक्य आहे. आतापर्यंत कर्करोगाच्या रेडिएशन थेरेपीमध्ये कर्करोगाच्या उतीबरोबर आरोग्यासाठी लाभदायक असणार्या उतीही नष्ट होत होत्या. परंतु, पार्टिकल बीम यशस्वी झाले तर शरीराच्या आरोग्यवर्धक उतीचे कोणतेही नुकसान न होता केवळ ट्यूमरलाच आपले लक्ष्य करता येईल.
|

