2009: देशातील महत्त्वाच्या घडामोडी
जानेवारी* 5 जानेवारी- डिझेलच्या किंमती कमी झाल्याने व सर्व्हिस टॅक्समध्ये कपात करण्याच्या मागणीवरून ट्रान्सपोर्टचा देशव्यापी संप.* 22 जानेवारी- ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी परिक्षण.* 22 जानेवारी- चायनाच्या खेळण्यांवर भारत सरकारने निर्बंध लावला. फेब्रुवारी 25
फेब्रुवारी- केंद्रीय माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना 13 वर्ष पूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने 13 वर्षांची शिक्षा सुनावली. 28
फेब्रुवारी- सीमा सुरक्षेची पूर्ण जबाबदारी नौसेनेकडे सोपविण्यात आली.मार्च * 4 मार्च- भारतीय निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना विरोध.एप्रिल * मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीस प्रारंभ.मे* 28 मे- विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन 15 केंद्रीय विद्यापीठाना वर्ष 2009-10 च्या बजेटमध्ये मंजुरी.जून* 14 जून - चित्रपट अभिनेता शायनी आहुजाला मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक.
* 15 जून- मिदनापूर (प. बंगाल) मध्ये नक्षलवाद्याचा जाळपोळ. लालगड व सालबोनी क्षेत्रात अर्धसैनिक दलाच्या जवानांना रोखले.
जुलै
* 6 जुलै- आर्थिक वर्ष 2009-10चा बजेट लोकसभेत सादर केला. आयकरमध्ये 10 हजार रुपयांपर्यंतची सुट.
* 13 जुलै- गव्हाच्या निर्यातीवर सरकारचा निर्बंध लावला. त्यासाठी एक मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.
ऑगस्ट
* 3 ऑगस्ट- मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी विशेष पोटा न्यायालयाकडून तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
सप्टेंबर
* 11 सप्टेंबर- निठारी हत्याकांडातील एक आरोपी मनिंदर सिंह पंढेरला इलाहाबाद उच्च न्यायालयाने बरी केले तर नोकर सुरेंद्र कोळीला फाशीची शिक्षा सुनावली.
* 26 सप्टेंबर- एअरइंडियाचा वैमानिकांचा संप.
ऑक्टोबर
* महाराष्ट्र, हरियाणा, अरूणाचल प्रदेश व ओडिसा या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात अशोक चव्हाण, हरियाणात भूपेंद्र सिंह हुड्डा, अरूणाचल प्रदेशमध्ये दोरजी खांडू कॉग्रेसची सरकार बसली तर ओडिसामध्ये बीजदचे नवीन पटनायक मुख्यमंत्री बनले.
नोव्हेंबर
* समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना महाराष्ट्र विधानसेभेत मारहान केल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे चार आमदार निलंबित.
डिसेंबर
ऑनलाईन होणारी कॅट परीक्षा 8 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सर्वर जाम झाल्याने परीक्षा तीन वेळा रद्द झाली. संसदेत या प्रकरणावरून खूप गदारोळ झाला.