शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2017
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:24 IST)

सरकारची सर्वात मोठी घोषणा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना

या २०१७ वर्षातील सर्वात मोठी घोषणा होती ती म्हणजे शेतकरी कर्ज माफी योजना होय. कर्जमाफी करण्यात यावी यासाठी अनेक शेतकरी संघटना पुढे आल्या आणि सरकार विरोधात त्यांनी आंदोलने केली. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला आणि अखेर शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. या योजनेत कर्ज असलेल्या शेतकरीवर्गाला सरसकट दीड लाख कर्जमाफी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान  योजनेची घोषणा केली.
 
या योजेनेत राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे. ही कर्जमाफी करतांना 1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज सरसकट माफ  केले आहे. तर दीड लाखांहून ज्यांचे जास्त थकबाकी आहे. या शेतकऱ्यांसाठी समझोता योजना (One Time Settlement) लागू करण्यात आली आहे.
 
तर दुस्र्कडे सरकारने 2012 – 2013 ते 2015 – 2016  चार वर्षांतील  ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या 25 टक्के अथवा 25 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल.
 
मात्र या योजनेचा लाभ फक्त शेती करत असललेल्या शेतकऱ्यांना होणार असून सरकारने राज्यातील विद्यमान आणि माजी मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान आणि माजी संसद सदस्य, विद्यमान आणि माजी विधिमंडळ सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य शासनाचे तसंच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरविले आहे. मात्र कोणत्याही ठिकाणी काम करत असलेल्या  चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
 
या योजनेमुळे कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची संख्या - ८९ लाख जवळपास आहे.यामध्ये ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकरी लाभ घेऊ शकत आहेत.  यामध्ये १.५० लाख रुपये च्या आतील थकबाकीदार शेतकरी  ३६ लाख असून त्यांना (थकीत कर्जाची रक्कम रुपये १८,१७२ कोटी रुपये) इतकी आहे. तर १.५० लाख रुपये च्या वरील  थकबाकीदार शेतकरी संख्या  ८ लाख आहे. त्यांची कर्जाची थकीत रक्कम रुपये ४,६०० कोटी रुपये आहे. यामध्ये जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत होते त्यांची संख्या ३५ लाख इतकी आहे. या योजेंत एकूण अश्या प्रकारे राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४,०२२ कोटी रुपये इतकी  कर्जमाफी देण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे तपासा- aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करा. - इथे वरच्या कोपऱ्यात इंग्रजी आणि मराठी असे दोन पर्याय दिसतील, तुम्हाला शक्य ती भाषा निवडा. - जर इंग्रजी सिलेक्ट केला तर डाव्या बाजूला, Chatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana – Year 2017  हे दिसणार आहे.