शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By

2018 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले हे प्रसिद्ध सेलिब्रिटीज

वर्ष 2018 मध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीज लग्नाच्या बेडीत अडकले. या वर्षी असे विवाह पार पडले ज्यांच्या बद्दल चाहत्यांना अत्यंत उत्सुकता होती. काही सोहळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पार पडले तर काही असे होते ज्यांची जगभर चर्चा झाली.
 
1. ओलंपियन बॉक्सर मनोज कुमार - ऑक्टोबर 2018 मध्ये ओलंपिक बॉक्सर मनोज कुमार यांनी विवाह केला. त्याने हुंडा न घेता लग्न केले आणि साखरपुड्यात केवळ मूठभर तांदूळ घेऊन समाजाला संदेश दिला.

 
2. ओलंपियन कुस्तीपटू विनेश फोगाट - डिसेंबर 2018 मध्ये ओलंपियन कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीपटू सोमवीर राठीशी विवाह केला. मान-पान म्हणून केवळ एक रुपया घेऊन संपूर्ण लग्न विधी अगदी सोप्या पद्धतीने पार पाडली गेली. लग्नात अनेक पहलवान पाहुणे देखील हजर होते म्हणून पाहुण्यांसाठी खास हेल्थी फूडची मेजवानी होती. विनेश लग्नानंतर देखील ट्रेनिंग चालू ठेवणार. 
3. बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया - मे 2018 मध्ये 37 वर्षीय बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाने त्यांच्यापेक्षा दोन वर्ष लहान अभिनेता अंगद बेदीशी पंजाबी रीतीनुसार विवाह केला. आनंद करज दिल्लीतील गुरुद्वारा येथे झाला. हा विवाह गुप्तपणे झाला.
4. कॉमेडियन कपिल शर्मा - कॉमेडियन कपिल शर्माने डिसेंबर 2018 मध्ये गिन्नी चतरथ बरोबर लग्न केले. कपिलने 24 तासांत दोन्ही पद्धतीने लग्न केले. एक विवाह हिंदू रीतीप्रमाणे तर दुसरा सिख पद्धतीने झाला. दोन रिसेप्शन देण्यात आले. एक अमृतसरमधील घरात आणि दुसरे मुंबईत. जिथे कपिलचे मित्र, व्यावसायिक भागीदार आणि बॉलीवूड, टीव्ही आणि खेळ जगतातील सितारे सामील झाले. 
5. बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर - बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने मे 2018 मध्ये व्यवसायी आनंद आहुजाशी विवाह केला. तीन दिवसीय विवाह सोहळ्यात सितारे सामील झाले. मेंदी, संगीत, विवाह सोहळा आणि रिसेप्शन सर्वकाही अगदी धूमधडाक्याने पार पडलं.
6. बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल - भारतीय स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांनी देखील डिसेंबर 2018 मध्ये विवाह केला. सायनाने नियत तारखेच्या दोन दिवस आधीच अतिशय साधेपणाने लग्न केले. लग्न गुप्तपणे घडले आणि याबद्दल तेव्हा कळले जेव्हा सायना ने स्वत: आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचे फोटो पोस्ट करून माहिती दिली.
7. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण - दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी या वर्षी 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीच्या लेक कोमो येथे विवाह केला. पहिल्या दिवशी, लग्न कोकणीच्या अनुष्ठानानुसार झाले आणि दुसऱ्या दिवशी सिंधी पद्धतीने. सुरक्षा खूपच जास्त होती, पाहुण्यांना सोशल मीडियावरील लग्नातील कोणतीही चित्रे शेअर न करण्यास सांगण्यात आले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर या जोडप्याद्वारे तीन रिसेप्शन देण्यात आले. पहिला बंगलोरमध्ये, दुसरं आणि तिसरं मुंबईमध्ये. 
8. बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा - डिसेंबर 2018 मध्ये जोधपुरच्या उमाद भवन पॅलेसमध्ये तीन दिवसांचा उत्सवात प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह झाला. यांचे लग्न देखील दोन पद्धतीने झाले, ख्रिश्चन आणि हिंदू अनुष्ठानानुसार. निक आणि प्रियंकाच्या वयांमध्ये 11 वर्षांचा अंतर आहे. प्रियंका वयाने खूप मोठी असल्याने हा विवाह जग भरात चर्चेचा विषय ठरला. 
9. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी ईशा अंबानी - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सामील असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी आणि आनंद पिरामलच्या हायप्रोफाइल लग्नाची बातमी जगप्रसिद्ध झाली. 12 डिसेंबर रोजी, ईशा अंबानी आणि उद्योगपती आनंद पिरामल यांच्या लग्नात बॉलीवूड, राजकारण आणि उद्योगातील मोठे - मोठे दिग्गज सामील झाले. अहवालानुसार या विवाहात 700 कोटी रुपये खर्च झाले आहे. लग्नाच्या ठिकाणांपासून मेन्यूपर्यंत, सर्व काही खूपच खास होते. प्रत्येक व्यवस्था इतकी भव्य आणि विलक्षण होती की जगभरात या लग्नाची चर्चा अजून देखील सुरू आहे.

10. मिलिंद सोमण- भारतीय सुपरमॉडल, अभिनेता, चित्रपट निर्माता आणि फिटनेससाठी ओळखले जाणरे मिलिंद सोमण यांनी अंकिता कवंर हिच्यासोबत 23 एप्रिल 2018 रोजी विवाह केला. विशेष म्हणजे मिलिंद 52 वर्षाचे तर अंकिता 27 वर्षाची आहे. मिलिंद यांचे हे दुसरे लग्न असून लग्न अलीबाग येथे मराठी पद्धतीने पार पडले. दोघांच्या वयात अंतर असल्यामुळे हे लग्न खूप चर्चेत होतं.