मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By

2018 तील मराठी टॉप 10 चित्रपट

चुंबक
प्रसिद्ध गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी चुंबकमध्ये प्रभावी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले. साहिल जाधव आणि संग्राम देसाई या दोघांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. संदीप मोदींनी दिग्दर्शित केलेल्या या  चित्रपटाला बॉलीवूडच्या सुपरस्टार अक्षय कुमार यांनी प्रस्तुत केले होते. चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटीया आणि नरेन कुमार यांनी केली होती.

गुलाबजाम
या चित्रपटाने प्रेक्षकांची गोड भूक भागवली. सुखदु:खांच्या आठवणी आणि त्याच्या आंदोलनात आयुष्य असते हा सोपा आणि सुंदर आशय अत्यंत तरलपणाने सचिन कुंडलकर यांनी गुलाबजाम या चित्रपटातून आणला आहे. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिकेने सजलेली गुलाबजामाची चव प्रेक्षकांना आवडली.
मुंबई पुणे मुंबई 3
मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी अगदी सहज स्वीकारले. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे प्रेक्षकांनी अगदी आपल्या घरातील वाटू लागले. अशात सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले.
मुळशी पॅटर्न
राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला. पुण्यातील मुळशी परिसरातील गुन्हेगारी विश्वावर आधारित हा सिनेमा आपल्या विषयामुळे खूप गाजला. प्रवीण ‌‌विठ्ठल तरडे दिग्दर्शित या सिनेमात मोहन जोशी, महेश मांजरेकर, स्वत: प्रवीण तरडे, ओम भुतकर, क्षितिश दाते, उपेंद्र लिमये, सुरेश विश्वकर्मा यांनी प्रमुख भूमिका गावल्या होत्या.

नाळ
प्रेक्षकांच्या मनातच नव्हे तर बॉक्स ऑफीसवर देखील ‘नाळ’ चित्रपटाने धुमाकूळ घालता. आपण दत्तक आहोत हे कळल्यावर एका लहान मुलाची काय अवस्था होते हे यात पाहायला मिळाले आहे. नागराज मुंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित या चित्रपटात स्वत: नागराज आणि देविका दफ्तरदर व लहान मुलाच्या भूमिकेत श्रीनिवास पोकळेने प्रेक्षकांशी नाळ जोळून घेतली.

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
डॉ. घाणेकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित या चित्रपटात सुबोध भावे यांनी आजच्या पिढीसाठी त्यांना जिवंत केले. प्रसाद ओक, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी यांनी त्या काळातील प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, सुलोचना, भालजी पेंढारकर आदींच्या व्यक्तिरेखाही नीट रेखाटल्या आणि नाट्यप्रेमी कलावंताच्या जीवनाला चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न के ला.

रेडू
मालवणी भाषेचा रेडू चित्रपटात कोकणी माणसाच्या आयुष्यात एकेकाळी रेडिओला असलेलं महत्त्व आणि त्याचं जग हे प्रेक्षकांना पसंत पडले. साहज वंजारी यांच्या दिग्दर्शनाखाली शंशाक शेंडे यांनी प्रभावी भूमिका साकारली.चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकले.

फर्जंद
‘फर्जंद’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे कळून आले. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे यातील महत्त्वपूर्ण मध्यवर्ती भूमिका साकारणारा कोंडाजी फर्जंद. ही भूमिका अंकित मोहन यांनी साकारली. एक सुंदर कलाकृती पाहायल मिळाली असा प्रेक्षकांचा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला.

आपला मानूस
सतीश राजवाडे दिग्दर्शित नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अगदी मोजके कलाकार परंतू सस्पेंस फॅमिली ड्रामा म्हणून आपला माणूस चित्रपटाने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. पिढ्यांतील अंतर केंद्रबिंदू असलेला हा सिनेमा बघाताना प्रत्यक्षात काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता बांधून ठेवते.

न्यूड
चित्रपटाच्या नावावरूनच उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली होती. रवी जाधव यांच्या या चित्रपटात न्यूड मॉडेलिंग करणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीचा संघर्ष दाखवण्यात आले. हा धाडसी विषयावर तयार चित्रपटात चंद्राक्काची भूमिका छाया कदम यांनी साकारली. हा चित्रपट दांभिक संस्कृती रक्षकांना सणसणीत चपराक होता.

या व्यतिरिक्त माउली, यंटम, बकेट लिस्ट, आम्ही दोघी आणि इतर अजून चित्रपट चर्चेत राहिले आणि लोकांचा प्रतिसाद या चित्रपटांना मिळाला.