Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2018 तील मराठी टॉप 10 चित्रपट

Updated: शनिवार, 29 डिसेंबर 2018 (12:37 IST)

फर्जंद
‘फर्जंद’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे कळून आले. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे यातील महत्त्वपूर्ण मध्यवर्ती भूमिका साकारणारा कोंडाजी फर्जंद. ही भूमिका अंकित मोहन यांनी साकारली. एक सुंदर कलाकृती पाहायल मिळाली असा प्रेक्षकांचा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला.

आपला मानूस
सतीश राजवाडे दिग्दर्शित नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अगदी मोजके कलाकार परंतू सस्पेंस फॅमिली ड्रामा म्हणून आपला माणूस चित्रपटाने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. पिढ्यांतील अंतर केंद्रबिंदू असलेला हा सिनेमा बघाताना प्रत्यक्षात काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता बांधून ठेवते.

न्यूड
चित्रपटाच्या नावावरूनच उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली होती. रवी जाधव यांच्या या चित्रपटात न्यूड मॉडेलिंग करणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीचा संघर्ष दाखवण्यात आले. हा धाडसी विषयावर तयार चित्रपटात चंद्राक्काची भूमिका छाया कदम यांनी साकारली. हा चित्रपट दांभिक संस्कृती रक्षकांना सणसणीत चपराक होता.

या व्यतिरिक्त माउली, यंटम, बकेट लिस्ट, आम्ही दोघी आणि इतर अजून चित्रपट चर्चेत राहिले आणि लोकांचा प्रतिसाद या चित्रपटांना मिळाला.

नाळ
प्रेक्षकांच्या मनातच नव्हे तर बॉक्स ऑफीसवर देखील ‘नाळ’ चित्रपटाने धुमाकूळ घालता. आपण दत्तक आहोत हे कळल्यावर एका लहान मुलाची काय अवस्था होते हे यात पाहायला मिळाले आहे. नागराज मुंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित या चित्रपटात स्वत: नागराज आणि देविका दफ्तरदर व लहान मुलाच्या भूमिकेत श्रीनिवास पोकळेने प्रेक्षकांशी नाळ जोळून घेतली.
 
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
डॉ. घाणेकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित या चित्रपटात सुबोध भावे यांनी आजच्या पिढीसाठी त्यांना जिवंत केले. प्रसाद ओक, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी यांनी त्या काळातील प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, सुलोचना, भालजी पेंढारकर आदींच्या व्यक्तिरेखाही नीट रेखाटल्या आणि नाट्यप्रेमी कलावंताच्या जीवनाला चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न के ला.
 
रेडू
मालवणी भाषेचा रेडू चित्रपटात कोकणी माणसाच्या आयुष्यात एकेकाळी रेडिओला असलेलं महत्त्व आणि त्याचं जग हे प्रेक्षकांना पसंत पडले. साहज वंजारी यांच्या दिग्दर्शनाखाली शंशाक शेंडे यांनी प्रभावी भूमिका साकारली.चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकले.
 
फर्जंद
‘फर्जंद’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे कळून आले. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे यातील महत्त्वपूर्ण मध्यवर्ती भूमिका साकारणारा कोंडाजी फर्जंद. ही भूमिका अंकित मोहन यांनी साकारली. एक सुंदर कलाकृती पाहायल मिळाली असा प्रेक्षकांचा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला.
 
न्यूड
चित्रपटाच्या नावावरूनच उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली होती. रवी जाधव यांच्या या चित्रपटात न्यूड मॉडेलिंग करणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीचा संघर्ष दाखवण्यात आले. हा धाडसी विषयावर तयार चित्रपटात चंद्राक्काची भूमिका छाया कदम यांनी साकारली. हा चित्रपट दांभिक संस्कृती रक्षकांना सणसणीत चपराक होता.
 
आपला मानूस
सतीश राजवाडे दिग्दर्शित नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अगदी मोजके कलाकार परंतू सस्पेंस फॅमिली ड्रामा म्हणून आपला माणूस चित्रपटाने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. पिढ्यांतील अंतर केंद्रबिंदू असलेला हा सिनेमा बघाताना प्रत्यक्षात काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता बांधून ठेवते.
 
या व्यतिरिक्त माउली, यंटम, बकेट लिस्ट, आम्ही दोघी आणि इतर अजून चित्रपट चर्चेत राहिले आणि लोकांचा प्रतिसाद या चित्रपटांना मिळाला.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नागपुरात दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून; गुन्हा लपवण्यासाठी रचले खोटे नाटक

नाशिकच्या मसुदा मतदार यादीतून १०.२७ लाखांहून अधिक नावे वगळली

सणासुदीच्या काळात बनावट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर एफडीए कारवाई करणार

मराठा आरक्षणाच्या लढाईत मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा आमने सामने आले

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दप्तराचे वजन १०% पेक्षा जास्त नको; शिक्षण विभागाचा आदेश

पुढील लेख
Show comments