1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2024 (20:02 IST)

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान, रविवारी रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. युक्रेनियन शहर खार्किवचे महापौर इहोर तेरेखोव्ह यांनी सोशल मीडियावर सांगितले की, दोन रशियन क्षेपणास्त्रांनी एका रिसॉर्टवर हल्ला केला. लोक इथे विश्रांती घेत होते. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे.
 
खार्कीव्हच्या बाहेरील एका रिसॉर्टमध्ये दोन स्फोट झाले, ज्यात पाच ठार आणि 16 जखमी झाले, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच वेळी, दुसरा हल्ला कुप्यान्स्क जिल्ह्यातील दोन गावांमध्ये झाला. यात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. रशियाने 15-20 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडवले. रिसॉर्टच्या पलीकडे राहणारी व्हॅलेंटिनी ही महिला हल्ल्याच्या वेळी घरीच होती
 
रविवारच्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, जग रशियन दहशतवाद रोखू शकते. आणि हे करण्यासाठी नेत्यांमधील राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दूर करावा लागेल. 
 
Edited by - Priya Dixit