शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (13:08 IST)

Russian Maissile Attack: डनिप्रोवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 25 हून अधिक युक्रेनियन नागरिक ठार

दक्षिण-पूर्व युक्रेनमधील डनिप्रो शहरावर रविवारी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने एका निवासी इमारतीला लक्ष्य केले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत 25 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. या हल्ल्यात 73 जण जखमी झाल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. 39 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर 43 जणांचा शोध सुरू आहे.

युक्रेनचे लष्करप्रमुख जनरल व्हॅलेरी झालुझनी यांनी सांगितले की, रशिया शनिवारी रात्रीपासून देशभरात सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. रशियाने शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यापैकी राजधानी कीववर 33 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी 21 क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण यंत्रणेने हवेत डागली. त्याच वेळी, युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की केएच-22 क्षेपणास्त्राने डनिप्रोमध्ये हल्ला केला.
 
Edited By - Priya Dixit