बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

सचिनने पाकविरुद्ध खेळायला हवे होते!

WD
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामी जोडीदार ठरलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णयाचे स्वागत केले, परंतु या महान फलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळायला हवे होते. असेही गांगुलीने म्हटले.

सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना गांगुली म्हणाला, सचिनने पाकविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळायला हवे होते, परंतु निवृत्तीचा निर्णय हा त्याचा स्वत:चा असून, तो योग्यच आहे, असे मला वाटते. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळावे की नाही, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, परंतु त्याच्या निर्णयाचे मला मुळीच आश्चर्य नाही.