बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. सचिन तेंडुलकर
Written By
Last Updated : सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (15:50 IST)

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने केले बाईपण भारी देवा चे कौतुक, पत्नीसह चित्रपट बघितले

sachin tendulkar , baipan bhari deva review
Twitter
sachin Tendulkar : सध्या बाईपण भारी देवा ने चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात होत आहे. या चित्रपटाचे भरभरून कौतुक सर्वत्र होत आहे. या चित्रपटाने सर्व मोठ्या सेलिब्रिटींना देखील भुरळ पाडली आहे. क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर देखील या चित्रपटाला भुलले आहे. त्यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या पत्नीसह हा चित्रपट बघितला. आणि या चित्रपटांच्या कलाकारांची भेट घेतली.त्यांनी या चित्रपटाच्या विषयी ट्विट केले आहे. 
 
ते म्हणाले 'बाईपण भारी देवा हा चित्रपट हृदयाला भेडणारा आहे. आपण वेगळे होतो ते एकमेकांच्या अजून जवळ येण्यासाठी. हा चित्रपट पाहून मला मनापासून आनंद झाला आहे. माझी आई आणि मावशी हा चित्रपट कधी पाहतात मला असं वाटत आहे. या चित्रपटाच्या कलाकारांना भेटण्याच्या माझा अनुभव फारच सुखद आहे. 
 
बाईपण भारी देवा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.हा  चित्रपटन सर्व मोठ्या मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. लहान मोठे, वृद्ध तरुण सर्वांना या चित्रपटाने वेड लावले आहे. 
 



Edited by - Priya Dixit