बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. सचिन तेंडुलकर
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (21:30 IST)

क्रिकेटचा देव सचिनच्या शिरपेचात मानाचा तुरा, वानखेडेमध्ये सचिनच्या पुतळ्याचं अनावरण!

Sachin Tendulkar
भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसापूर्वी वानखेडे स्टेडियमवर एक विशेष कार्यक्रम पार पडला आहे.
 
वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआयचे सजिव जय शाह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार देखील उपस्थित होते.
 
या पुतळ्याचं अनावरण स्वत: सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी सचिन तेंडुलकरच्या कुटुंबासह इतर बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
हा पुतळा सचिन तेंडुलकर स्टँडजवळ उभारण्यात आला आहे. याच मैदानावर खेळून सचिन तेंडुलकर मोठा क्रिकेटपटू झालाय.  सचिन आणि वानखेडे यांचे नाते खूप जुने आहे. या स्टेडियमवर त्याने धावांच्या राशी उभारल्या आहेत. याच मैदानावर त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor