बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

वन-डेतील सचिनच्या विक्रमांवर एक नजर

WD
क्रिकेटचा देव मानल्या जाणारा महान फलंदाज ‍सिचन तेंडुलकरने रविवारी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने एकदिवसीय‍ क्रिकेटमध्ये एवढे विक्रम केले आहेत, की त्याच्या विक्रमापर्यंत पोहोचेल, असा एखादाही खेळाडू सध्या तरी क्रिकेटमध्ये दिसन नही. सचिनने 23 वर्षांच्या कारकिर्दीत 463 एकदिवसीय सामन्यांत 452 डावांत फलंदाजी करतरना 41 वेळा नाबाद राहत 44.83च्या प्रभावी सरसरीने 18,426 धावा काढल्या.

या महान खेळाडूने आपल्या खेळाने क्रिकेटला नवी उंची गाठून दिली, तसेच विक्रमांची एवढी मोठी यादी तयार केली, की त्या यादीच्या जवळपासही पोहोचणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्नच असू शकते. सनिच्या विक्रमांची यादी एवढी मोठी आहे, की त्याला विक्रमांचा पर्याय म्हटल्यास वावगे ठरू नये. त्याच्या याच दैदीप्यमान एकदिवसीय कारकिर्दीतील काही ठळत घडामोडीवर टाकलेली नजर

सर्वाधिक 463 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणार फलंदाज
एकदिवसी क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शकते
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 90 पेक्षा अधिक धावांवर बाद
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा काढणार पहिला खेळाडू
विश्वचषकात सर्वा‍धिक धावा काढण्याचा विश्वविक्रम
विश्वचषकात सर्वाधिक वेळा सामनाविर पुरस्कार पटकावण्याचा विश्वविक्रम
2003च्या विश्वचषकात सर्वाधिक 373 धावा काढण्याचा विश्वविक्रम
2003च्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार
आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10मध्ये सलग 10 वर्षे राहण्याचा विश्वविक्रम
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पटकावणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू
एक कॅलेंडर वर्षात 1,894 धावा काढण्याचा विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामानावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू
सौरव गांगुलीसोबत सलामीला 128 सामन्यांत सर्वाधिक 6,271 धावांचा विक्रम
1999च्या विश्वचषकात राहुल द्रविडसोबत 331 धावांची विश्वविक्रमी भागीदारी
सहा वेळा 200 धावांची भागीदारी करण्याचा विश्वविक्रम
क्रिकेट खेळणार्‍या सर्वाच आघाडीच्या संघांविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1,000 धावा काढण्याचा विक्रम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावा आणि 150 बळी घेणारा एकमेव क्रिकेटपटू
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी 2,016 चौकार.