Marathi Biodata Maker

श्री साई बाबांचे गुरु पाठाचे अभंग

Updated: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (23:14 IST)
गणू म्हणे गुरु वाचुनी या नर
तो ची जाण खर (2) दो पायांचा
 
निष्ठावंत भाव हाच देतो फळ
अभक्तिचा मळ (2) निमालिया 
चहाड दू तोंड्या ऐसा नारदमुनी
तरी झाला तरणी (2) प्रह्लादाते
 
गोपी चन्दे गुरु नीतीशी काढिला
पुढें तोची झाला (2) वंद्य त्याते
गणू म्हणे सोने चढे मोला अंगे
कसोटीच्या संगे (2) जगा माझी
गणू म्हणे सोने चढे मोला अंगे
 
क्षमा, शांती, दया असे जया ठायी
तसे ज्ञान पाही संपूर्ण ते
जयाचीये शिरी ईश्वराचा हात
तोच सद्गुरूनाथ करावा हो
बाहेरील सोंगा भुलू नका कदा
पंतगाते दगा दीपा पाशी
 
गणू म्हणे हंस पाण्याते टाकुनी
घेत असे शोधूनी जैसे दूध
 
हिरे आणि गारा हे त्याचे खाणीत
तैसे बद्ध मुक्त जगा माझी
 
पारखीतो येता ही राधे वेचुनी
कुक्कुट पायानी कालवितो
मुमुक्षु पारखी चार वाक कोंबडा
कुक्कुटा उकिरडा गोड वाटे
 
गणू म्हणे जो का असे भाग्यवंत
त्याचाच हेत गुरु पायी
 
क्षमा शांती युक्त भावाभिचे जहाज ..
ऐसा सद्गुरू राज शिर्डी माझी
क्षमा शांती युक्त भावाभिचे जहाज ..
ऐसा सद्गुरू राज शिर्डी माझी
 
नामा भिता जयाची शोभे बाबा साई ..
अनाथांची माई तिचं जाण
नामा भिता जायची शोभे बाबा साई ..
अनाथांची माई तिचं जाणा
 
अनाथ सनाथ आन भेद जेथे ..
सुर्यप्रकाशाते निवड तैची
अनाथ सनाथ आन भेद जेथे ..
सुर्यप्रकाशाते निवड तैची
 
माझा गुरुराज जान्हवीचे जळ ..
गणू अर्पी भाळ तया पायी
माझा गुरुराज जान्हवीचे जळ ..
गणू अर्पी भाळ तया पायी
 
अंगकाठी उंच केलीसी धारण ..
कळवावया खूण भक्तजना
अंगकाठी उंच केलीसी धारण ..
कळवावया खूण भक्तजना
 
उच्च ज्ञान जिका अध्यात्म साजीरे ..
तेची सेवा सारे कल्याणार्थ
उच्च ज्ञान जीक अध्यात्म साजीरे ..
तेची सेवा सारे कल्याणार्थ
 
परी नका सोडू – पेंगणे ली लता ..
नये थोर होता पाल्याविण
परी नका सोडू – पेंगणे ली लता ..
नये थोर होता पाल्याविण
 
गणू म्हणे बाळ तांबूस सावळा ..
सगुरूची लीला अगाधाची
गणू म्हणे बाळ तांबूस सावळा ..
सगुरूची लीला अगाधाची
 
सद्गुरुरायानी जला तेल केले
दीप उजाळेले लक्षावधी
 
ठेऊनीया दीप उषा पायथ्याशी
पहुडे फलीसी गुरुमूर्ती

त्याच्या त्या कृतीचा हाच आहे अर्थ
कदा अंधारात निजू नये
 
गणू म्हणे माया दुधर्र अंधार
ज्ञानदिप थोर म्हणुनी लावा
 
शिव , विष्णू , ब्राह्म रूप बाबा साई
भाव दुजा काही मानू नका
भाव दुजा काही मानू नका
 
सदगुरु रायाची पायचीजी धूळ
तेच गंगाजळ शुद्ध माना
 
अमृता आगळी मुखीची वचने
तिच माना मने गीता जेवी
 
गणू म्हणे बाबा वसंत सोज्वळ
भक्तांनो कोकिळ व्हारे तुम्ही

सर्व पहा

श्री दुर्गा देवीची आरती - दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

दीड दिवसांचा गणपती: विसर्जन पद्धत आणि त्यामागील परंपरा

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

Rishi Panchami Katha Marathi ऋषि पंचमी पौराणिक आणि प्रामाणिक कथा

Rishi Panchami Aarti Marathi Lyrics ऋषी पंचमी आरती मराठी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments