1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. छत्रपती शिवाजी महाराज जयंती
Written By
Last Updated : गुरूवार, 6 जून 2024 (09:33 IST)

Shiv Rajyabhishek Din 2024 Wishes In Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

shivaji maharaj
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा...

''माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा 
जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा'' 
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा...

''प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, 
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा'' 
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा 
 
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
 
शिवराज्याभिषेक दिनी
छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा

''होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, 
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा 
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा''  
 
शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
 
सोहळा हा स्वराज्याचा,
महाराष्ट्राचा अस्मितेचा
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!