गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (10:18 IST)

शिवाजी महाराज घोषवाक्य Shivaji Maharaj Slogan

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी.
 
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस... सिहांसनाधीश्वर...  योगीराज... श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
 
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
 
महाराsssssज गडपती... गजअश्वपती...भूपती... प्रजापती... सुवर्णरत्नश्रीपती... अष्टवधानजागृत... अष्टप्रधानवेष्टित... न्यायालंकारमंडित... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत... राजनितिधुरंधर... प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
 
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
 
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा...  गर्जा महाराष्ट्र माझा...  जय शिवराय
 
ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
 
झाले बहू .. होतील बहू...  पण शिवरायांसारखा कोणीच नाही
 
सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो...  तो म्हणजे छत्रपती
 
ना शिवशंकर... . ना कैलासपती...  ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती...  देव माझा तो राजा छत्रपती
 
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
 
वैकुंठ रायगड केला...  लोक देवगण बनला...  शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला... 
 
शौर्यवान योद्धा...  शूरवीर...  असा एकच राजा जन्मला ... . तो आमुचा शिवबा. 
 
निश्चयाचा महामेरु...  बहुत जनांसी आधारु... अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
 
बघतोस काय रागाने?
कोतळा काढलाय वाघाने !
 
मित्रानो माझा रक्ता रक्तात भिनलंय काय...
जय शिवराय... जय शिवराय...
 
अतुलनीय...  अलौकीक...  अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी! 
 
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
 
निधड्या छातीचा मराठा गडी एकेक
ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन
मनात शिवतेजाची आग आहे...