1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Updated : गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (11:48 IST)

श्राद्धात खीर-पुरी आणि वड्‍याचं महत्तव

shraddha paksh
हिंदू धर्मात पितृक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. या दरम्यान पूर्वजांना अन्न आणि पाणी देऊन संतुष्ट करण्याची प्रथा आहे. या दरम्यान श्राद्ध तिथीला खीर-पुरीचा स्वयंपाक केला जातो.. यामागील कारणं जाणून घ्या-
 
पितृ पक्षात शिजवलेले अन्न देणगी स्वरूपात देण्याचे विशेष महत्व आहेत. खीर हे पायस अन्न मानले जाते. पायस हा पहिले प्रसाद मानले जाते. या मध्ये दूध आणि तांदळाची शक्ती आहे. तांदूळ असे धान्य आहे जे जुनं झाले तरीही खराब होत नाही. तांदूळ जेवढा जुना असतो तेवढाच चांगला असतो. तांदुळाच्या या गुणधर्मामुळे ते जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या संस्कारात समाविष्ट केला जातो. म्हणून पितरांना खिरीचा प्रसाद असतो.
 
या मागील सार्वजनिक मान्यता अशी आहे की भारतीय समाजात खीर-पुरी साधारणतः सणासुदीच्या वेळेस केले जाणारे पदार्थ आहे. पितृपक्ष हे देखील पितरांचा सण मानले जाते. असे म्हणतात की या काळात आपले पितृ किंवा पूर्वज आपल्या घरी भेट देतात. त्यांचा आतिथ्यासाठी खीर-पुरी बनवतात.
 
या मागे एक व्यावहारिक कारण देखील आहे. श्रावणाचा महिना उपवासाचा महिना म्हणून धरला जातो. बरेच लोकं महिनाभर उपवास करायचे, त्यामुळे त्यांना फार अशक्तपणा येत असे. भाद्रपद महिन्यात श्राद्धात खीर-पुरीचे जेवण त्यांना सामर्थ्य देत असायचे म्हणूनच खीर-पुरी बनवायची ही प्रथा सुरु करण्यात आली.
 
तसचं श्राद्ध कर्मात वड्याचं देखील खूप महत्तव आहे. अनेक ठिकाणी या काळात केले जाणारे वडे वर्षभरात कधी बनवत नाही. या दिवसात भरड्याचे वडे केले जातात. 
 
या दिवसात चुकून हे अन्न शिजवू नये- 
श्राद्ध पक्षात मोहरी, शिळे अन्न, हरभरा, मसूर, उडीद, कुळीद, सातू, मुळा, काळे जिरे, कांचनार, काकडी, काळे उडीद, काळे मीठ, दुधी भोपाळा, कांदा आणि लसूण हे पदार्थ वापरु नये.