शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम

pitru paksh
1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे.
2. श्राद्धात चांदीचे भांडी वापरावे. सर्व भांडी चांदीच्या नसल्यास तरी एखादं भांड तरी चांदीचे वापरावे.
3. श्राद्धात यशाशक्ती ब्राह्मण भोजन करवावे. शक्य नसल्यास एक तरी ब्राह्मणाला भोजन करवावे.
4. ब्राह्मणाला भोजन करवताना वाढत असलेल्या भांडी दोन्ही हाताने धरावे. भोजन दोन्ही हाताने प्रदान करावे.
5. ब्राह्मणाने भोजन मौन राहून करावे. मौन असल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणार्‍यांनी आणि जेवणार्‍यांनी मौन राहावे.
6. श्राद्धात मसालेदार पदार्थ नसावे तसेच पदार्थ पितरांच्या पसंतीचे असल्यास अती उत्तम असतं.
7. श्राद्ध स्वत:च्या घरात करावे. दुसर्‍यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे. तसेच तीर्थ स्थळ किंवा मंदिरात श्राद्ध करायला हरकत नाही.
8. धर्म शास्त्र ज्ञानी असलेल्या ब्राह्मणाला भोजन करवावे. कारण श्राद्धात पितरांची तृप्ती ब्राह्मणाद्वारे होते.
9. शक्य असल्यास श्राद्धात कुळातील मुली, जावई, नातवंड यांनाही प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावावे.
10. श्राद्धाच्यावेळी दारावर भिकारी आल्यास त्यालाही आदरपूर्वक भोजन करवावे. पितर कोणत्याही रूपात येऊ शकतात.
11. भोजन झाल्यावर ब्राह्मणांना घराच्या दारापर्यंत सन्मानपूर्वक विदा करावे. ब्राह्मण भोजनानंतर कुटुंबातील इतर लोकांनी प्रसाद ग्रहण करावे.
12. श्राद्ध गुप्त रूपाने करावे. पिंडदानावर नीच लोकांनी दृष्टी पडल्यास ते पितरांपर्यंत पोहचत नाही.