पितृपंधवड्यात हे 6 उपाय केल्याने पैशाची तंगी दूर होण्यास मदत मिळेल
हिंदू धर्मात ऋषी मुनींनी वर्षाच्या एका पक्षाला पितृपक्ष हे नाव दिले आहे. ज्या पक्षात आम्ही आपल्या पितरेश्वरांचे श्राद्ध, तर्पण, मुक्तीसाठी विशेष क्रिया संपन्न करतो त्याला श्राद्ध पक्ष म्हणतात. या पक्षात पितरांच्या प्रसन्नतेसाठी जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरातील आर्थिक तंगी दूर होते व पितरांचे आशीर्वादपण मिळतात ....
ज्या मृतकाचे श्राद्ध असेल त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करून ब्राह्मण भोज केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सदैव बरकत राहते.
श्राद्धच्या दिवशी मरणार्या व्यक्तीच्या वयानुसार गरिबांना त्या गोष्टी दान केल्या पाहिजे ज्या त्यांना आवडत होत्या. त्याने त्यांना शांती मिळते आणि गृह क्लेश दूर होतो.
श्राद्ध पक्षात जर तुम्ही तर्पण करू शकत नसाल तर आपल्या पूर्वजांच्या नावाने एक पांढरी मिठाईचे दान गरीब व असहाय मुलांना दिले पाहिजे.
पितृ पक्षात पशू पक्ष्यांना अन्न जल दिल्याने विशेष लाभ होतो. यांना भोजन दिल्याने पितृगण संतुष्ट होतात. हे उपाय केल्याने कार्यात येणारी अडचण दूर होते.
पितरांच्या निमित्ताने भोजन बनवून त्याचे पाच भाग केले पाहिजे. प्रत्येक भागात जवस आणि तीळ मिसळून त्यांना गाय, कावळा, मांजर व कुत्र्याला खाऊ घाला, पाचवा भाग सुनसान जागेवर ठेवला पाहिजे.
पितृ तर्पणात काळ्या तिळाचा प्रयोग जरूर करा. असे केल्याने पितृ कृपा करतात आणि पैशाची तंगी दूर होते.