शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (17:28 IST)

या सात संकेतांनी कळत की तुमचे पितर नाराज नाही, खूश आहे

शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त करतात जे पितृलोकाच्या यात्रेवर आहे. या प्रमाणे आपल्या पितरांना श्राद्धाच्या माध्यमाने देण्यात आलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि ते श्राद्ध करणार्‍या व्यक्तींना आशीर्वाद देतात. जास्तकरून लोक श्राद्ध पक्षात नवीन काम करत नाही, पण ज्या लोकांवर पितरांची कृपा असते त्यांना नवीन काम केल्याने फायदा होतो, म्हणून जाणून घेऊ त्या संकेतांबद्दल जे सांगतात की तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद आहे …
 
* ज्या लोकांचे आपल्या आई वडिलांसोबत संबंध चांगले असतात आणि घरात कधी कोणाचा आकस्मिक मृत्यू झालेला नसतो तर अशा परिवारांवर पितरांची विशेष कृपा असते. 
 
* श्राद्ध कालामध्ये अचानक धन प्राप्ती, अडकलेले काम होणे किंवा नवीन काम सुरू होणे पितर कृपांचे संकेत आहे. 
 
* तुमच्या घरात मृत व्यक्तीची आठवण काढताच कामात येत असलेल्या अडचणी दूर होतात तर तुमच्यावर पितरांची विशेष कृपा आहे. 
 
* जर तुमच्या स्वप्नात पितृ अर्थात पूर्वज खूश आणि आशीर्वाद देताना दिसतात तर श्राद्ध पक्ष तुमच्यासाठी शुभ आहे. 
 
* जेव्हा कुठले नवीन काम सुरू करताना तुमच्या मोठ्याचा सहकार्य तुमच्या पाठीशी असेल तेव्हा समजून घ्या की तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद आहे. 
 
* स्वप्नात 'नागा'ला तुमची सुरक्षा आणि सहयोग करताना बघणे अर्थात पितरांची तुमच्यावर कृपा आहे. 
 
* अमावस्या किंवा त्या तिथीच्या जवळपास जेव्हा लोकांना जास्तकरून नुकसान होत असत तेव्हा तुम्हाला विशेष लाभ होणे किंवा वाहन सुख मिळणे पितरांची तुमच्यावर कृपा असण्याचे संकेत आहे.