Marathi Biodata Maker

Shravan 2025 : श्रावण सोमवारी शिवामूठ कशी व्हावी, पद्धत जाणून घ्या

सोमवार, 18 ऑगस्ट 2025 (07:55 IST)
श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन पूजा करावी. निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
 
शिवामूठ व्रत
विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जातात. 
 
व्रत करण्याची पद्धत
विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केलं जातं. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.
 
यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने, तांदूळ, सुपारी, गन्ध, फूल वाहून पूजा करावी. आणि या क्रमाने धान्याच्या एक-एक मूठ देवावर वाहव्या. धान्यमूठ उभी धरून वाहावी. या मुठी वाहताना पुढील मंत्र म्हणावा-
 
नमः शिवाय शांताय पंचवक्‍त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
 
किंवा "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा" असे तीन वेळा म्हणावे.
ALSO READ: Shivamuth Katha कहाणी सोमवारची शिवामुठीची
प्रथम सोमवारी तांदूळ
दुसर्‍या सोमवारी पांढरे तीळ
तिसर्‍या सोमवारी मूग
चौथ्या सोमवारी जवस
आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे.
 
दिवसभर उपास करावा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपास सोडावा. पाच वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी. नंतर ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन व्रताची सांगता करावी.
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

आषाढी एकादशीला या ११ गोष्टी केल्यास श्रीविठ्ठलाची विशेष कृपा मिळते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री भक्तामर स्तोत्र : Bhaktamar Stotra श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा दिव्य स्त्रोत

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

गंगा माता स्तोत्रम् | Ganga Mata Stotram गंगा मातेच्या कृपेचा अनुभव देणारे पवित्र स्तोत्र

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments