रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (08:04 IST)

Belpatra Plant : श्रावणात या प्रकारे लावा बेलपत्राचे रोप

Belpatra Plant धार्मिक मान्यतेनुसार बेल वृक्षाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे, त्यामुळे या वृक्षात माता पार्वतीची सर्व रूपे वास करतात. आणि बेलपत्रात माता पार्वतीचे प्रतिबिंब असल्यामुळे ते भगवान शंकराला अर्पण केले जाते.
 
या संदर्भात एक अशी श्रद्धा आहे की, जो तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही, त्याने श्रावण महिन्यात बेल वृक्षाचे रोपण, संगोपन व संरक्षण केले तर त्याला भोलेनाथाच्या साक्षात्काराचा लाभ होतो.
 
एवढेच नाही तर जर एखाद्या व्यक्तीने बिल्व वृक्षाच्या मूळ भागाची पूजा करून त्याला जल अर्पण केले तर त्याला सर्व तीर्थांचे दर्शन घेण्याचे पुण्य प्राप्त होते आणि भगवान शंकराचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिष शास्त्रानुसार 3 व्यतिरिक्त 5 पाने असलेले बेलपत्र लावणे उत्तम मानले जाते.
 
तर चला जाणून घेऊया श्रावणात कशा प्रकारे लावावे 3 किंवा 5 पानांचे बेलपत्राचे रोप belpatra plant in sawan
 
1. जर तुम्हाला घरामध्ये एका कुंडीत 3 किंवा अधिक पाने असलेले बेलाचे रोप वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रो बॅग किंवा मोठ्या कुंड्याची निवड करावी लागेल.
 
2. रोप लावण्यासाठी सर्वातआधी माती तयार करा ज्यासाठी गांडूळ खत, वाळू, कोकोपीट आणि शेणखत एकत्र मिसळून माती तयार करा.
 
3. तुम्ही बेलपत्राचे कटिंग म्हणजेच त्याची रोपे कोणत्याही नर्सरीमधून विकत घेऊन तयार कुंडीत लावू शकता.
 
4. कुंडीत रोप लावल्यानंतर काही दिवस सावलीच्या जागी ठेवा.
 
5. जेव्हा त्याची पाने वाढू लागतात आणि झाडाची वाढ होईल, तेव्हा वरती वाढणारी पाने पिंच करुन काढून टाका. हे आपल्या रोपाची वाढ सुधारेल. तसेच वनस्पतीमध्ये अधिक पाने वाढण्यास सुरवात होईल.