1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

मंगळागौरी पूजन साहित्य Mangalagaur Pooja Sahitya in Marathi

Mangalagaur Pooja Sahitya मंगलागौरी व्रत श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. हे व्रत विवाह झालेल्या स्त्रिया पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी ठेवतात. विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावे.
 
पूजासाहित्य
या पूजेसाठी लागणार्‍या साहित्याची यादी-
हळद, कुंकु, गुलाल, बुक्का, मध, १ खण, चौरंग, रांगोळी, अत्तर, कापसाची वस्त्रे, पाट किंवा आसने ३, नारळ २, जानवीजोड, कणकेचे किंवा पुरणाचे दिवे १६, समई, निरंजन, सुपार्‍या १५, कापूर, कणकेचे अलंकार, पळी, भांडे, हळकुंडे ५, उदबत्ती, हार, सुट्टी फुले, गजरे, तांब्या २, बदाम ५, तांदूळ १/२ किलो, बेल, दुर्वा, तुळस, पत्री, ताम्हण २, खारका ५, जिरे, मुगाची डाळ, पांढरे तीळ, विड्याची पाने २५, ताट २, दिव्यासाठी तेल-तुप, गूळ खोबरे, केळी ६, फळे ५, वाट्या ८, काडवाती, फुलवाती, खडीसाखर, मंगळागौर किंवा अन्नपूर्णा मूर्ती, शंख, घंटा, तेलवाती, पेढे, काड्यापेटी, सुट्टे पैसे २० नाणी, पंचामृत ( दही, दूध, तूप, साखर, मध ), हात पुसण्यासाठी व देव पुसण्यासाठी फडकी २, इतर सुवासिनींसाठी भेटवस्तू
 
पत्री
चमेलीची पाने, मक्याची पाने, बेलाची पाने, बोरीची पाने, धोतर्‍याची पाने, तुळशीची पाने, शमीची पाने, आघाडयाची पाने, डोरलीची पाने, कण्हेरीची पाने, रुईची पाने, अर्जुनसादडयाची पाने, विष्णुक्रांतीची पाने, जाईची पाने, शेवंतीची पाने, डाळिंबीची पाने.
 
नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून, सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करुन सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सवाष्णींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं.
 
नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करत 'गौरी गौरी सौभाग्य दे ' अशी प्रार्थना करतात. सामूहिकरीत्या ही पूजा केली जाते. ज्या घरी मंगळागौरीची पूजा करतात तेथे संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्री फराळाचे जिन्नस करतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.