नकळतपणे वाट बघते मी रे श्रावणा, दरवर्षी तुझ्या येण्याची!
असा कसा रे तू?मनस्वी अन चंचल,
लावतो जीवास घोर, पण तरीही अनमोल,
वर्षोनुवर्षे झालीत, तू येण्याची वाट बघते,
नाही गुंताव म्हणते, पण अधिक गुंतत जाते,
अंगावरचे तुषार आठवतात, तर कधी स्पर्श थंडगार,
भटकंती आठवते, तुझ्यावर होऊन केलेली स्वार,
उगीचच हसत असते मनोमन, आलास की तू,
हवं असतं मज हेच सगळं, नको रे इतका गुंतू!
मोकळी कशी होऊ मी तुझ्या पाशातून,
वेड लावण्या येतोस, नेतोस मला माझ्यातून,
तुझा सहवास देऊन जातो तृप्ती, पूर्ण वर्षाची,
नकळतपणे वाट बघते मी रे श्रावणा, दरवर्षी तुझ्या येण्याची!
..अश्विनी थत्ते.