1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By वेबदुनिया|

Shrawan Special बटाटे- राजगिर्‍याचा पराठा

साहित्य - ३ ते ४ उकडलेले बटाटे, २ चमचे वाटलेली हिरवी मिरची, जिरेपुड १ चमचा, फोडणीसाठी तूप व जिरे.

आवरण- २ वाटी राजगिर्‍याचे पीठ, पाव चमचा मीठ व २ चमचे तेल घालून भिजवून घ्यावे. घट्ट गोळा तयार करून घ्यावा.

कृती- प्रथम पॅनमध्ये थोड्या तुपावर जिरे व वाटलेली मिरची घालावी. १ च. जिरे पुड घालावी व उकडलेले बटाटे स्मॅश करून घालावे. चवीनुसार तिखट, मीठ घालावे व परतावे. सारण तयार होईल, थंड करायला ठेवावे.

पराठा कृती- राजगिर्‍याचे भिजवलेले पीठ तुपाचा हात लावून चांगले मळून घ्यावे व लहान लहान लाट्या करून मधोमध आलूचे सारण भरावे. पराठा लाटून गरम तव्यावर दोन्ही बाजूनी तूप लावून शेकून घ्यावा. दह्याच्या चटणीसोबत किंवा दाण्याच्या चटणीसोबत वाढावा.

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश