सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जुलै 2023 (12:25 IST)

Shrawan 2023 : श्रावण महिना कधी सुरु होईल

shrawan
R S
When will the month of Shravan start यंदा श्रावण दोनदा! श्रावण महिना कधी सुरु होईल, सोमवार किती, कोणता उपवास कराल? जाणून घ्या
 
येत्या सोमवारी दीप अमावास्येनंतर मंगळवारपासून अधिक श्रावणमासाची सुरुवात होत आहे. यंदा 18 जुलैपासून अधिक श्रावण तर 17 ऑगस्ट पासून निज श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी नाही तर एक महिना अगोदर दीप अमावस्या येणार आहे. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजेच 17 जुलै रोजीच गटारी म्हणजेच दीप अमावस्या असणार आहे. मात्र श्रावण हा 17 ऑगस्टपासूनच सुरु होईल, अशी माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली आहे.
 
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. यंदा अधिकमास येत असल्याने हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. श्रावण महिना जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा भाविकांचा उत्साह वाढत चालला आहे.
shrawan
R S
श्रावण म्हटला की श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व असते, मात्र यंदा अधिक मास येत असल्याने तब्बल दोन महिन्यांचा श्रावण असल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन महिन्याचा श्रावण असल्याने सोमवारीही आठ आले आहेत. मात्र श्रावणी सोमवार चारच आहेत, अधिक महिन्यात उपवास केल्यास उत्तमच असल्याचे सतीश शुक्ल म्हणाले आहते.
 
यंदा तब्बल 19 वर्षांनंतर अधिक मास हा श्रावणात आला असून यामुळे रक्षाबंधन लांबणीवर गेले आहे. तसेच चातुर्मासही पाच महिन्यांचा होणार आहे. दरम्यान अधिक महिना श्रावणात आल्याने श्रावण महिना हा 59 दिवसांचा असणार का? 4 ऐवजी 8 श्रावणी सोमवार येणार का? असे अनेक संभ्रम भविकांमध्ये निर्माण झाले असून हेच संभ्रम आता आम्ही दूर करणार आहोत.
 
18 जुलैपासून अधिक श्रावण तर 17 ऑगस्ट पासून निज श्रावण महिन्याला सुरुवात होत असून श्रावणी सोमवार हे चारच असून 21 ऑगस्टला पहिला सोमवार येणार आहे. मात्र अधिक श्रावणात उपवास केल्यास फलदायी ठरतील. यात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक मासमुळे श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी नाही तर एक महिना अगोदर म्हणजेच 17 जुलैला दिप अमावस्या ज्याला मद्यप्रेमी गटारी अमावस्या म्हणून संबोधता ती साजरी करावी लागणार आहे.
 
देवशयनी एकादशीला चातुर्मासाला सुरुवात झाली असून, त्यातच श्रावण हा अधिक मास आल्याने शास्त्रात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोन अधिक मासात जास्तीत जास्त 35 तर कमीत कमी 27 महिन्यांचा कालावधी जातो. 2020 मध्ये आश्विन, 2023 मध्ये श्रावण, तर 2026 मध्ये ज्येष्ठ हा अधिक मास असेल. यंदा नीज श्रावण मास 17ऑगस्टला सुरू होत असून, श्रावणात येणारे सण नीज श्रावणातच साजरे करावेत, असे आवाहन सतीश शुक्ल यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor