MHNEWS आपल्याकडे श्रावण शुद्ध पंचमी हा दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो. वास्तविक जुन्या धार्मिक ग्रंथात नागपंचमीच्या सणाबद्दल काहीही संदर्भ कथा आढळत नाही. मात्र नागमाहिमा सांगणार्या अनेक लोककथा भारतभर उपलब्ध आहेत. आर्य प्राचीन काळापासून नागपूजा करीत, असे अनेक संदर्भ मिळतात. गृहस्थाश्रमी पुरुष जी धार्मिक गृहकृत्ये करतो त्याला गृह्यविधी म्हणत. गौतमनामक एका...