रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. शीख
  3. शिखांचे सण
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (14:34 IST)

Guru Nanak Jayanti 2022: गुरु नानक जयंतीच्या दिवशी प्रकाश उत्सव का साजरा केला जातो

gurunanak
गुरु नानक जयंती 2022: दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी, शीख धर्माचे पहिले गुरू, गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी गुरु नानक देव यांची जयंती साजरी होत आहे. गुरु नानक देवजी यांचा जन्म कार्तिक पौर्णिमेला श्री नानकाना साहिब, पाकिस्तान येथे झाला. गुरु नानक देव यांची जयंती गुरु पर्व आणि प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. गुरुपर्वात सर्व गुरुद्वारांमध्ये भजन, कीर्तन आयोजित केले जातात आणि प्रभातफेरीही काढली जाते. अशा परिस्थितीत गुरु नानक देव कोण होते आणि त्यांची जयंती कशी साजरी केली जाते हे जाणून घेऊया.
 
गुरु नानक यांची जन्मतारीख आणि ठिकाण
पहिले शीख गुरु नानक यांचा जन्म 1469 मध्ये पंजाव प्रांतातील तलवंडी येथे झाला. ही जागा आता पाकिस्तानात आहे. हे ठिकाण नानकाना साहिब म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या लोकांसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे. गुरु नानक यांच्या आईचे नाव तृप्ता आणि वडिलांचे नाव कल्याणचंद होते.
 
नानकजी लहानपणापासूनच आपला बहुतेक वेळ चिंतनात घालवायचे. त्यांना सांसारिक गोष्टींमध्ये रस नव्हता. नानक देवजी हे संत, गुरू आणि समाजसुधारकही होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवजातीच्या कार्यासाठी वाहून घेतले. 
 
गुरु नानक जयंतीचे महत्त्व
गुरु नानक जयंती गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. शीख धर्मातील हा सर्वात महत्वाचा सण आहे. गुरुनानक जयंतीच्या दिवशी गुरुद्वारांमध्ये कीर्तन दरबार सजतो. सकाळी वाहे गुरुजींच्या नावाचा जयघोष करत प्रभातफेरी काढली जाते. तसेच गुरुद्वारांमध्ये भाविकांसाठी लंगरचे आयोजन केले जाते. 
Edited by : Smita Joshi