शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. शीख
  3. शीख धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (10:39 IST)

Lohri 2021 : प्रेम, विश्वास आणि ऐक्याचे सण

शीख समुदायाचं महत्त्वपूर्ण असलेला सण लोहरी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 13 जानेवारी ला पंजाबी कुटुंबामध्ये विशेष उत्साह असतो कारण या दिवशी लोहरी सण साजरा केला जातो. हा सण शीख कुटुंबासाठी महत्त्वाचा सण असतो. या सणा मध्ये उत्साह तेव्हा वाढतो जेव्हा घरात नवीन सून आल्यावर किंवा मुलाचा जन्म झाल्यावरची पहिली लोहरी असेल. या दिवशी लोहरी पूजनाचे साहित्य एकत्रित करून संध्याकाळी कुटुंबियांसह विशेष पूजा करून अग्नी प्रज्वलित करून संपूर्ण कुटुंब अग्नीच्या भोवती प्रदक्षिणा लावतात.
 
पंजाब आणि जम्मू-काश्मीर मध्ये 'लोहरी' नावाने मकर संक्रांती सण साजरा केला जातो. या सणाला पंजाबी समाज पूर्ण उत्साह आणि आनंदाने साजरा करतो. लोहरी साजरी करण्यासाठी लाकडाच्या ढिगावर शेणाच्या गोवऱ्यां ठेवतात. सामूहिकरीत्या हा सण साजरा केल्यावर लोहरी पूजा केल्यावर त्यामध्ये तीळ, गूळ, रेवडी आणि शेंगदाणे अर्पण करतात.
 
 प्रसादात प्रामुख्याने तीळ, जक, गूळ,शेंगदाणे आणि पॉपकॉर्न वाटतात.या सणाचे विशेष आकर्षण म्हणजे ढोलाच्या तालावर गिद्दा आणि भांगडा डांस करणे आहे. या दिवसाचा संबंध नवसाशी जोडलेला आहे म्हणजे ज्या घरात नवी सून आली आहे किंवा ज्या घरात मुलाचा जन्म झालेला आहे, त्या कुटुंबात आनंद साजरा करून लोहरी चा सण साजरा केला जातो. नातेवाईक आणि आप्तेष्ट त्यांना आजच्या दिवशी विशेष भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात.
 
गायीच्या गोवऱ्यांची माळ बनवून नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात लोहरीमध्ये ती माळ घालतात. ज्याला चरखा चढवणे म्हणतात. लोहरी आणि मकर संक्रांती हे सण एकमेकांशी जुडल्या मुळे सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवाचा एक अद्भुत सण आहे. सध्याच्या बदलत्या काळात देखील या सणात प्रेम, ऐक्य, आणि विश्वास दिसून येतो.