मुगाचे डोसे
साहित्य : 1 किलो मूग, चार चमचे मिरची पावडर, थोडी हळद, चार चमचे धने पावडर, चवीनुसार मीठ, पाणी.
कृती : मूग बारीक दळून आणणे. पाच मोठे चमचे पीठ घ्यावे. त्यात मिरची पावडर, धने पावडर, थोडी हळद, चवीनुसार मीठ, पाणी घालावे. डोशाप्रमाणे मिश्रण तयार करावे. नॉनस्टिकच्या तव्यावर डोसे करावेत. नारळाच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे. गरमागरम डोसे खूपच सुरेख लागतात. हे डोसे पौष्टिक आहेत.