शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By

स्पेशल समर रेसिपी : चिंचेचा भात

साहित्य : 1 मोठा चमचा तूप किंवा लोणी घालून शिजवलेला 3 कप भात, 1/2 कप चिंचेचा घोळ, 3 मोठे चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे आलं किसलेलं, 2 लहान चमचे तिखट, 1 लहान चमचा हळद, 1/4 चमचा हिंग पूड, 6-8 हिरव्या मिरच्या कापलेल्या, 3-4 लाल सुक्या मिरच्या, गोड लिंबाच्या 2 काड्या, 5 चमचे काजूचे काप, 1/2 कप तेल, मीठ चवीनुसार. 
 
कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात हरभऱ्याची डाळ, सुक्या मिरच्या, गोड लिंब, हिरव्या मिरच्या, हिंग पूड घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात मीठ, हळद, तिखट, आलं पेस्ट, काजू आणि 1/2 पाणी घालून चांगले एकजीव करून घ्यावे. मंद आचेवर ठेवून 15-20 मिनिट उकळी आणावी.
 
या मिश्रणाला भातावर ओतावे व वरून चिंचेचा घोळ टाकून चांगले मिक्स करून गरम गरम सर्व्ह करावा.