गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

दुधीभोपळ्याचा झुणका

साहित्य : 250 ग्रॅम दुधी भोपळा, 1/2 वाटी बेसन, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, फोडणीसाठी मोहरी, जिरं, चिमटीभर हिंग, मीठ चवीनुसार, 1 चमचा धणे पूड, तेल आवश्यकतेनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेला, 1 लिंबू.

कृती : सर्वप्रथम दुधी भोपळा सोलून त्याचा किस करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी जिऱ्याची फोडणी घालावी. भोपळ्याचा किसाला तेलात घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. वरून बेसन लावावे व चांगले एकजीव करावे. 5 मिनिटाने त्यात बाकी सर्व साहित्य घालून झाकण ठेवून त्यावर पाणी घालून शिजू द्यावे. सर्व्ह करताना कोथिंबीर व लिंबू घालून सर्व्ह करावे.