- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - चव दक्षिणेची
ब्रेडचे लाडू
साहित्य : शिळी ब्रेड, साखर, वेलची पूड किंवा इसेन्स, तूप 2-3 चमचे, तांदुळाची पिठी, काजू, मनुका, चारोळी, पिस्ता. कृती :सर्वप्रथम बेडचा बारीक चुरा करून त्यात तांदुळाची पिठी व तूप टाकून मिसळावे. नंतर त्याला एका भांड्यात टाकून कुकराची शिटी न लावता थोडी वाफ द्यावी. भांडे खाली काढून त्यात वेलची पूड किंवा इसेन्स मिसळावे. थंड झाल्यावर त्या मिश्रणात पिठी साखर मिसळून त्याचे लाडू बांधावे. हे लाडू झटपट होतात व चवदार लागतात.