शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

मुरक्को

मुरक्को उदीड डाळ
साहित्य : 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी उदीड डाळ, 1/2 वाटी खोवलेले खोबरे, 1 चमचा हिंग, 2 चमचे मीठ, तळण्यास तेल.

कृती : तांदूळ चार ‍तास भिजत घालावे व नंतर रोवळीत उपसावे. थोडे कोरडे झाल्यवर बारीक करून चाळून घ्यावे. उडदाची डळ बदामी रंगावर भाजून दळून आणावी. दोन्ही पिठे एकत्र करून त्यात मीठ, हिंग, खोबर्‍याचे घट्ट दूध घालून पाण्याने पीठ भिजवावे. या पिठाचा बेताचा गोळा डाव्या हाता ठेवून बोटातून दाबून त्याला पीळ घालावा. कागदावर चकली घालावी व तेलात गुलाबी रंगावर तळावी.