आव्हरी कोस्टची जपानवर मात

fifa world cup
रेसिफे (ब्राझील)| wd| Last Modified सोमवार, 16 जून 2014 (11:30 IST)
सुरुवातीपासून 64 व मिनिटापर्यंत पिछाडीवरून पडलेल्या आव्हरी कोस्ट संघाने दोन मिनिटात दोन गोल करून चमत्कार घडविला.

क गटातील प्राथमिक फेरीच्या दुसर्‍या साखळी सामन्यात आव्हरी कोस्टने जपानचा 2 विरुध्द 1 गोलने पराभव केला. या गटात या सामन्यापूर्वी कोलंबियाने ग्रीसला 3-0 ने नमविले होते. कोलंबिया आणि आव्हरी कोस्टचे प्रत्येकी दोन-दोन गुण झाले आहे. पराभूत झालेल्या ग्रीस आणि जपान संघापुढे दुसरी फेरी गाठण्यासाठी कठीण आव्हान उभे राहिले आहे.


जपानचा संघ आशियाई विजेता आहे. या दोन संघात आजपर्यंत तीन सामने खेळले गेले होते. कोस्टने एक लढत जिंकली होती. जपानने दोन विजय मिळविले होते. आव्हरी कोस्टचे मानांकन 23 आहे तर जपान त्यांच्यापेक्षा दुप्पट कमी मानांकनावर म्हणजे 46 व्या स्थानावर आहे. आव्हरी कोस्टने विश्वचषकाच प्राथमिक फेरीत हा तिसरा विजय मिळविला. जपानने आक्रमक सुरूवात केली. त्यांनी सामन्यावर पकड घेतली अणि 16 व्या मिनिटास चौथ्या क्रमांकाच्या होंडाने जपानचा पहिला गोल केला. हा मैदानी गोल होता. या गोलमुळे जपानचे खेळाडू फॉर्मात आले. मध्यांतरास जपानचा संघ 1-0 असा आघाडीस होता. जपानने ही आघाडी मध्यांतरानंतरही कायम ठेवली. परंतु आव्हरी कोस्टने अनुभवी डीडी ड्रोगबा याला 62 व मिनिटास मैदानात उतरविले आणि त्याने सामन्याचे चित्र पालटून टाकले. त्याच्या उपस्थितीत पाऊस येऊन ओलसर झालेल्या मैदानावर आव्हरी कोस्टने दोन मिनिटात दोन गोल केले व सामना 2-1 ने जिंकला. राइट बॅकने दिलेल्या वेगवान क्रॉसपासवर विलफ्रेड बोनीने हेडरचा गोल केला. त्याने जपानच्या गोलरक्षकाला संधी दिली नाही. हा गोल होताच जपानचे उपस्थित समर्थक नाराज झाले तर आव्हरी कोस्टच समर्थकांच्या आनंदाला उधाण आले. 66 व मिनिटास क्रॉसपासवर गेरविन्हो याने हेडरचा गोल केला आणि याच गोलमुळे आव्हरी कोस्ट संघ विजयी ठरला. सांप्री लामोरुचीच्या आव्हरी कोस्ट संघाला गुरुवारी कोलंबियाशी खेळावे लागेल तर जपानचा संघ ग्रीसशी खेळेल. 2006 व 2010 मध्ये दुसरी फेरी गाठू न शकणारा आव्हरी कोस्ट संघ यावेळी मात्र दुसरी फेरी गाठण्यास उत्सुक बनला आहे. 64 मिनिटानंतरच्या उर्वरित खेळात जपानने गोल करण्याचे प्रयत्न केले. आव्हरी कोस्ट संघानेही वारंवार आक्रमणे केली. जपानचा गोलरक्षक कावारिमाने अनेक गोल वाचविले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले
चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...