बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार, 27 जून 2012 (17:17 IST)

इटलीच्या मजबूत तटबंटीस भेदणार जर्मनी

यूरो 2012
PR
PR
दमदार स्टाइकरांच्या धमाकेदार प्रदर्शनाच्या भरवशावर सेमिफायनल फेरित दाखल झालेल्या जर्मनीस चॅम्पियनस बनायचे झाल्यास इटलीच्या मजबूत ‍तटबंदीस भेदावे लागेल.

यूरो स्पर्धेत आतापर्यंत जर्मनीची मदार फुटबॉलवर राहिली आहे, तर इटलीने आपल्या भक्कम तटबंदीने सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यात रोमांचक मुकाबला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन्ही संघ याअगोदर फक्त एक-एक वेळाच सेमिफायनल फेरित पोहचून खाली हाताने परतले आहेत. यामुळे टक्कर अधिकच काट्याची होईल. इटली आतापर्यंत तीन वेळा सेमिफायनल फेरित दाखल होऊन दोनदा फायनल खेळली आहे, तर जर्मनी आठ वेळा सेमिफायनलमध्ये पोहचून सात वेळा फायनल खेळली आहे.