बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

उशेनिना बनली महिला बुद्धिबळ चॅम्पियन

उशेनिना
WD
आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये युक्रेनच्या अ‍ॅना उशेनिनाने बल्गेरियाच्या अँटोनेटा स्टेफानोव्हाला पराभूत करून विश्वविजेतेपदाला गवसणी घालती आहे. पहिल्या टायब्रेकमध्ये अ‍ॅनाने स्टेफानोव्हाला पराभूत केले. सुरुवातीच्या फेरीमध्ये 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर उशेनिनाने दुसर्‍या डावात निर्णायक आघाडी घेतली. या विजयामुळे अ‍ॅनाचा पुढील वर्षी चीनमध्ये होणार्‍या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तिने आपल्या विजयाचे सारे श्रेय आई-वडील, मित्र आणि समर्थकांना दिले आहे. या स्पर्धेत भारताची बुद्धिबळपटू डी. हरिका सेमीफायनलपर्यंतच टिकाव धरू शकली होती.