ऑस्ट्रेलिन खुले टेनिस : नदालचे स्वप्न भंगले!

मेलबर्न| Last Modified बुधवार, 28 जानेवारी 2015 (15:53 IST)
स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याचे ऑस्ट्रेलिन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकण्याचे
स्वप्न उद्ध्वस्त झाले.

पुरुष एकेरीच्या उपान्त्पूर्व सामन्यात तिस‍र्‍या स्थानावरील टॉमस बर्डिच याने नदालचा पराभव केला. रशियाची मारिया शारापोव्हाने महिला एकेरीची उपान्त्य फेरी गाठताना नवोदित येऊगेनी बाऊचर्ड हिचा पराभव केला.

14 ग्रॅन्डस्लॅम पटकाविणारा नदाल हा उपान्त्पूर्व सामन्यात विजाच्या शर्यतीत नव्हता. 2006 नंतर तो 17 व्या वेळी पराभूत झाला आहे. सातव्या स्थानावरील झेकच्या बर्डिच याने जोरदार सर्व्हिसचा खेळ केला. तसेच आक्रमक फटके मारले आणि नदालचा तीन सेटसमध्ये 6-2, 6-0, 7-6 (7-5) असा पराभव केला. नदालने तिसर्‍या सेटसमध्ये जोरदार झुंज दिली. परंतु वेळ निघून गेली होती.

बर्डिचने गतवर्षीही उपान्त्य फेरी गाठली होती. परंतु उपान्त्य फेरीत तो गतविजेत्या स्टान वावरिंकाकडून पराभूत झाला होता. तिसर्‍या
सेटसनंतर झुंझण्याची माझी तयारी होती, असे बर्डिच म्हणाला. मी सुरुवात चांगली केली परंतु राफालशी खेळत आहात त्यामुळे शेवटच्या गुणापर्यंत झगडणे हे माझे काम होते. मी हा उलटफेर करणारा विजय मिळविला, असे बर्डिच म्हणाला.
याऊलट महिला एकेरीत शारपोव्हाने येऊगेनी बाऊचर्डचा 6-3, 6-2 असा पराभव केला. थंड व ढगाळ हवामानात शारापोव्हाला फारसे कष्ट पडले नाहीत. तिने तरुण बाऊचर्डची (सातवी मानांकित) सर्व्हिस पहिल्या गेममध्ये भेदली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. बाऊचर्ड चांगला खेळ करीत होती. तरीही मला विजयाचा विश्वास होता, असे मारिया म्हणाली. ती सहावे ग्रॅन्डस्लॅम जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मारियाला एकटेरिना माकारोवा हिच्याशी खेळावे लागेल. माका रोबाने दुसर्‍या उपान्त्यपूर्व सामन्यात तिसर्‍या स्थानावरील सिमोना हालेप (रुमानिया) हिचा 6-4, 6-0 असा पराभव केला. 26 वर्षाच्या माकोरोवाने यापूर्वी येथे दोन वेळा उपान्त्यपूर्व फेरी गाठली. सात प्रयत्नात ती उपान्त्य फेरी गाठू शकली नव्हती.

अग्रमानांकित सेरेना विलिअम्स ही गतवर्षी अंतिम फेरी गाठणार्‍या डोमिनिका सिबुलकोव्हाशी खेळेल तर व्हिनस माडिसनशी खेळेल.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...