बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (10:37 IST)

गोपीचंदची हैदराबादमध्ये बॅडमिंटन अकादमी

gopichand hyderabad badminton academy
हैदराबाद: भारताचे प्रमुख राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी येथे सुसज्ज बॅडमिंटन अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अकादमीमध्ये बॅडमिंटनच्या 9 कोर्टचा समावेश आहे. हैदराबाद शहराच्या जवळ असलेल्या गच्चीबोली येथे गोपीचंद ही अकादमी सुरू करणार आहेत. या अकादमीमध्ये देशातील नवोदित बॅडमिंटनपटूंना प्रशिक्षणासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध राहील.
 
या अकादमीच्या स्थापनेची सर्व तयारी शेवटच्या टप्यात असून या अकादमीचे उद्घाटन पुढील महिन्याच्या प्रारंभी होईल, असे गोपीचंद यांनी सांगितले. या अकादमीचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री एस. सोनोवाल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.