बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: लंडन , सोमवार, 7 जुलै 2014 (11:41 IST)

जोकोविकने पटकावला विम्बल्डन किताब

wimbaldon 2014
नोवाक जोकोविकने रॉजर फेडररला हरवत दुसर्‍यांनादा विम्बल्डन किताब पटकावला आहे. जोकोविकने सातवेळा विम्बल्डन जिंकणार्‍या फेडररला 6-7 (7-9), 6-4, 7-6 (7-4), 5-7, 6-4 अशा सेटमध्ये पराभूत केले.
 
सातवेळा विम्बल्डन जिंकणारा स्वीस खेळाडू रॉजर फेडरर याने पहिला सेट 51 मिनिटात 7-6 ने जिंकला. 2011 साली विम्बल्डन जिंकणारा सर्बिायाचा नोवाक जोकोविकने दुसरा सेट 43 मिनिटात जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा सेट हा पहिल्या सेटप्रमाणे अत्यंत चुरशीचा व रंगतदार ठरला. हा सेट टाब्रेकरचा झाला. जोकोविकने हा सेट 7-6 (7-4) ने जिंकून पाच सेटसच लढतीत 2-1 अशी आघाडी घेतली. फेडररने दोन गेम पॉईंट वाचविले.  
 
तिसर्‍या सेटमधील बाराव्या गेममध्ये बरोबरी, अँडव्हान्टेज बरोबरी, पुन्हा अँडव्हान्टेज असा खेळ झाला. जोकोविक फेडररला बॅक हँड फटके माररण्यास लावत होता. जोकोविक व फेडरर हे दोघेही फोरहँडचा प्रभावी वापर करीत होते. दोघेही तुल्बळ स्पर्धक आहेत. दरम्यान आजच्या   अटीतटीच सामन्यात जोकोविकने रॉजर फेडररला हरवत त्याचे आठवेळा विम्बल्डन किताब जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जोकोविकने दुसर्‍यांदा विम्बल्डन किताब मिळविला आहे.