गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: कोलकाता , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (11:29 IST)

पेलेंच्या उपस्थितीत कोलकाता - केरळ लढत

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पहिल्या हंगामाचे विजेते अॅटलेटिको डी कोलकाता यंदाच्या मोसमातील घरच्या मैदानावरील पहिला सामना
इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पहिल्या हंगामाचे विजेते अॅटलेटिको डी कोलकाता यंदाच्या मोसमातील घरच्या मैदानावरील पहिला सामना मंगळवारी केरळ ब्लास्टर्सविरुद्ध खेळणार आहेत. पेले यांच्या उपस्थितीत हा सामना रंगणार असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्यंतराला मैदानात येऊन पेले छोटेखानी भाषण करणार असून कोलकात्याचा मालक सौरव गांगुली आणि केरळाचा सचिन तेंडुलकर यांनी भेटदेखील घेणार आहेत. दोन्ही संघांनी एक विजय व एक बरोबरी अशी कामगिरी केल्यामुळे आजच्या लढतीत चुरशीचा मुकाबला होईल.