बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2016 (16:03 IST)

बीएमडब्ल्यू कार नको रे बाबा - दिपा कर्मारकर

deepa karmakar
रिओ ऑलिम्पिकमध्ये उतम काम केलेल्या  भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर अनेक बक्षिसे भेटली. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते प्रदान करण्यात आलेली बीएमडब्ल्यू कार दीपाने परत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
कारच्या मेन्टेन्सच्या त्रासामुळे दीपाने हा निर्णय घेतला आहे. त्या बीएमडब्ल्यू कारचे मूळ मालक हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही चामुंडेश्वरनाथ यांना ही गाडी परत केली जाणारा आहे.
 
दीपा त्रिपुरा राज्यातील आगरतळामध्ये राहते. मात्र या शहरातील रस्ते निमुळते असल्याने आणि रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे वारंवार दुरुस्तीचा खर्च परवडत नाही.मेन्टेनन्सवर खर्च करण्यापेक्षा महिन्यावर आलेल्या चॅलेंजर्स कपसाठी तयारी करण्याचा सल्लाही तिला देण्यात आला आहे.
 
द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दीपाचे कोच बिश्वर नंदी यांनी आपण आणि दीपाच्या कुटुंबीयांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.