मोहन बागान प्रशिक्षकाचा राजीनामा
कोलकातामधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब मोहन बागानचा प्रशिक्षक संतोष कश्यप यांनी राजीनामा दिला आहे. या हंगामात संघाची निराशजनक कामगिरी झाली. याची जबाबदारी स्वीकारत कश्यप यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. प्रतिष्ठेच्या फेडरेशन फुटबॉल स्पर्धेत मोहन बागानला एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नमुष्की ओढवली. सध्याच्या आयलीगमधील पहिले दोन सामनेही त्यांनी गमावले आहेत. दरम्यान, मोहन बागान आता एका जर्मन प्रशिक्षकाचा शोध घेत आहे.