1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

रंगीत झाले हॉकीचे मैदान, वेधले प्रेक्षकांचे लक्ष

FILE
ऑलिम्पिकच्या इतिहासात फील्ड हॉकी स्पर्धात पहिल्यांदाच गुलाबी किनार असलेल्या निळ्या टर्फ वर होत आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी भडक रंगाचा वापर करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा मिडफील्डर वेड पेटन याने येथे खेळण्याचा अनुभव वेगळाच असल्याचे सांगितले. सुर्याची चकाकणारी किरणे टर्फ वर पडल्यावर अद्भूत अनुभव येतो. हिरव्या मैदानावर खेळण्यात येत असलेल्या इतर खेळांपेक्षा हॉकीस वेगळे रूप कसे द्यावे यावर दीर्घ काळापासून विचार सुरू होता. अधिकार्‍यांनी पांढर्‍या चेंडूऐवजी पिवळा चेंडू आणि हिरव्या ऐवजी निळ्या-गुलाबी टर्फचा उपयोग केला.

ऑस्ट्रेलियन डिफेंडर मार्क नोल्स याने ऑलिम्पिकमध्ये हॉकी बघण्यास सुंदर वाटत असल्याचे सांगितले. हॉकीचे मैदानास यामुळे वेगळी ओळख प्राप्त झाली असून हे चांगले आहे. टीव्हीवर बघणार्‍या प्रेक्षकांनाही हा टर्फ खूपच भावला असून चेंडू ओळखने सहज झाले आहे.