मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रिओ , शनिवार, 20 ऑगस्ट 2016 (11:02 IST)

रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला

भारताच्या पी. व्ही. सिंधूनं बॅडमिंटनच्या महिला एकेरीत रौप्यपदकाची कमाई करून ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये ती भारताची दुसरी पदकविजेती ठरली. तसंच ऑलिम्पिकच्या इतिहासात वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला हा मानही तिच्या नावावर झाला.
 
स्पेनच्या कॅरोलिना मरिननं फायनलमध्ये सिंधूचा संघर्ष 19-21, 21-12, 21-15 असा मोडून काढला. त्यामुळं सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.  एकेरीच्या फायनलमध्ये सिंधू वर्ल्ड नंबर वन आणि वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मरिनशी ज्या जिद्दीनं लढली ती पाहता साऱ्या भारतीयांसाठी सिंधू ही सुवर्णकन्याच ठरली. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी सिंधू ही सायना नेहवालनंतर दुसरी खेळाडू ठरली. सायनानं 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला होता. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकाचा मान मिळवणारी सिंधू ही केवळ पाचवी भारतीय महिला आणि चौदावी भारतीय खेळाडू ठरली.